शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तरूणींच्या रक्ताने आंघोळ करणारी क्रूर महिला, ६०० तरूणींची केली होती हत्या; कारण वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:43 IST

Elizabeth Bathory: फार पूर्वी या महिलेने कितीतरी लग्न न झालेल्या तरूणींची हत्या केली. बरं तिने या तरूणींची हत्या का केली याचं कारण तर आणखीच धक्का देणारं आहे.

Elizabeth Bathory: अनेक खतरनाक गुन्हेगारांच्या धक्कादायक गोष्टी नेहमीच समोर येत असतात. काहींनी लहान मुलांचा जीव घेतलेला असतो, तर काहींनी तरूणांचा...या लोकांचा जीव घेण्याची त्यांची कारणंही वेगवेगळी असतात. काही कारण तर इतकी विचित्र असतात की, एखादी व्यक्ती असंही करू शकते यावर सहज विश्वास बसत नाही. इतिहासातही अशा अनेक व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी विचित्र गुन्हे केले. आज आपण अशाच एका महिलेची कहाणी जाणून घेणार आहोत. फार पूर्वी या महिलेने कितीतरी लग्न न झालेल्या तरूणींची हत्या केली. बरं तिने या तरूणींची हत्या का केली याचं कारण तर आणखीच धक्का देणारं आहे.

इतिहासातील सर्वात क्रूर महिला सीरियल किलर

एलिझाबेथ बाथरी असं या क्रूर महिलेचं नाव होतं. अनेक हायप्रोफाइल केसेसबाबत आपण ऐकत असतो, तशीच काहीशी ही केस. ही महिला किती क्रूर होती याचा अंदाज आपण यावरून लावू शकता की, या महिलेला इतिहासातील सर्वात कुख्यात आणि निर्दयी महिला सीरिअल किलर म्हणून ओळखलं जातं. काळ होता १५८५ ते १६१० दरम्यानचा. इतक्या वर्षात एलिझाबेथने तब्बल ६०० हून अधिक तरूणींचा जीव घेतला होता. पण तिची क्रूरता इथेच थांबली नाही तर या तरूणींच्या रक्ताने तिने आंघोळ सुद्धा केली.

उच्चभ्रू परिवारातील सायको

एलिझाबेथने असं का केलं? असा प्रश्न नक्कीच आपल्याला पडला असेल. त्याआधी ती कोण होती हे जाणून घेऊया. एलिझाबेथ हंगरी साम्राज्यातील उच्चभ्रू बाथरी परिवारातील होती. तिचं लग्नही झालं होतं. फेरेंक नॅडेस्डी नावाच्या व्यक्तीसोबत तिचं लग्न झालं होतं. एलिझाबेथचा पती तुर्कीसोबत झालेल्या युद्धातील हंगरीचा नॅशनल हिरो होता.

असं सांगितलं जातं की, एलिझाबेथ आधी तरूणींना शारीरिक त्रास देत होती. शेवटी त्यांची हत्या करून त्यांचं रक्त एका टबमध्ये भरून त्यात आंघोळ करायची. याचा उल्लेख अनेक पुस्तकांमध्ये करण्यात आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे एलिझाबेथ बाथरीचा पती जिवंत होता, तेव्हाही ती तरूणींना तिची शिकार बनवत होती. पण १६०४ मध्ये त्याच्या मृत्युनंतर तिने जणू हत्या करण्याचा सपाटाच लावला होता. एलिझाबेथ स्लोवानियाच्या चास्चिस येथील तिच्या महालात राहत होती. तिथेच ती या तरूणींची हत्या करत होती.

असंही सांगितलं जातं की, एलिझाबेथ बाथरीला तिच्या या भयानक गुन्ह्यात तिचे तीन नोकर मदत करत होते. ती एका उच्चभ्रू परिवारातील होतील म्हणून ती आजूबाजूच्या गावातील गरीब मुलींना चांगले पैसे देऊन कामाचं आमिष दाखवून महालात बोलवत होती. पण या तरूणी महालात येताच तिच्या शिकार ठरत होत्या.

पुढे कालांतराने जेव्हा आजूबाजूच्या गावातील गरीब मुलींची सख्या कमी झाली तेव्हा तिने श्रीमंत घरातील मुलींना आपली शिकार बनवणे सुरू केलं होतं. ही बाब जेव्हा हंगरीच्या राजाला समजली. त्याने लगेच या गोष्टीची चौकशी करण्याचा आदेश दिला. तेव्हा पूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. चौकशी करणाऱ्या पथकाने एलिझाबेथच्या महालातून मुलींचे सांगाडे आणि सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले होते.

रक्ताने आंघोळ का करायची?

१६१० मध्ये एलिझाबेथ बाथरीला तिच्या या भयंकर कृत्यासाठी अटक करण्यात आली आणि तिला तिच्याच महालातील एका खोलीत कैद करण्यात आलं. तिथे चार वर्षांनी २१ ऑगस्ट १६१४ मध्ये तिचा मृत्यू झाला. असंही म्हणतात की, एलिझाबेथ फार सुंदर होती आणि तिला तिचं हे सौंदर्य कायम टिकवायचं होतं. या कारणानेच तिने ६०० तरूणींची हत्या केली होती. तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी ती त्यांच्या रक्ताने आंघोळ करत होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Cruel woman bathed in blood, killed 600 girls: Shocking reason.

Web Summary : Elizabeth Bathory, a notorious serial killer, murdered over 600 young women in the 16th-17th centuries. She bathed in their blood, believing it would preserve her youth. Arrested in 1610, she died in captivity.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारीhistoryइतिहास