शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

आपल्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर हत्तींनी व्यक्त केली कृतज्ञता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 16:59 IST

हत्तींच्या या कळपाची कृतज्ञता पाहून तिकडे उपस्थित लोकही भारावून गेले.

ठळक मुद्देकेरळच्या या नदीत एक हत्तीचं पिल्लू नदी ओलांडताना दलदलीत पडलं.हत्तींच्या या कळपाने या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. दुसऱ्या दिवशी ही बातमी गावभर पसरून वनाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली.

केरळ : सोशल मीडियावर आपण अनेक व्हिडिओ पाहतो.  त्यातून बरंच काही शिकण्यासारखं असतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये हत्तीच्या कळपाने कशाप्रकारे माणसाचे आभार मानले आहेत, हे दाखवण्यात आलंय. कृतज्ञता व्यक्त करणं किती गरजेचं आहे, हेसुद्धा या व्हिडिओतून दिसून येतंय. 

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, केरळच्या थत्तेकांडमधील उरुलांथन्नी या नदीत एक हत्तीचं पिल्लू नदी ओलांडताना दलदलीत पडलं. हत्तींच्या या कळपाने या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यांनी रात्रभर मेहनत घेतली. पण ते पिल्लू काही बाहेर आलं नाही. दुसऱ्या दिवशी ही बातमी गावभर पसरली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत ही बातमी पोहोचली. अधिकाऱ्यांनी लागलीच मदतीसाठी धाव घेतली. दलदलीत अडकलेल्या पिल्लू बाहेर काढण्यासाठी वनविभाग कामाला लागलं होतं. तब्बल ५ हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं.  गावकरी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने शेवटी दलदलीत अडकलेल्या हत्तीच्या पिल्लूला बाहेर काढण्यात यश आलं. मानवानं आपल्या पिल्लूला वाचवलं हे पाहून त्याच्या आईलाही आनंद झाला. आपल्या बाळाचे जीव वाचवल्याप्रकरणी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे या हेतूने त्या हत्तीणीने आपली सोंड उंचावून सगळ्यांचे आभार मानले. 

जरा हटके बातम्यांसाठी येथे क्लिक करा.

मुक्या जीवांना बोलता येत नसलं  तरीही त्यांनाही भावना असतात. म्हणूनच ए‌वढ्या मोठ्या संकटातून आपल्या बाळाचा जीव वाचवल्याप्रकरणी या हत्तीणीनं न बोलताच माणसांप्रकती आभार भाव व्यक्त केले आहेत. हत्तीणीनं आपली सोंड उंचावून न बोलताच धन्यवाद व्यक्त केल्यानंतर तिथं जमलेल्या गावकऱ्यांनीही आनंद व्यक्त केला. हत्तीणीची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचली हे सांगण्याकरता गावकऱ्यांनीही टाळ्यांचा आवाज केला. हा प्रकार घडला तेव्हा तिथं अनेकांनी व्हिडिओही काढले. त्यातलाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.  फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हा व्हिडिओ आता अनेकांच्या मोबाईलमध्ये आला असेल. कधी कधी माणसंही चांगल्या कामाबद्दल आभार व्यक्त करायला विसरतात. मात्र मुक्या प्राण्यांनी व्यक्त केलेली भावना पाहून त्यांनी माणसांना न बोलताच एक चांगला अध्याय शिकवला आहे. 

आणखी वाचा - डुकराच्या पोटातून मिळाला असा एक दगड ज्याची किंमत आहे कोटींच्या घरात

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूबKeralaकेरळ