या हत्तीला आवडते मसाला पान

By Admin | Updated: May 30, 2017 01:15 IST2017-05-30T01:15:20+5:302017-05-30T01:15:20+5:30

पान खाण्याची सवय असणाऱ्या अनेक व्यक्ती तुम्ही पाहिल्या असतील; पण एखाद्या हत्तीला दररोज मसाला पान खायला आवडते

This elephant favorite spice pan | या हत्तीला आवडते मसाला पान

या हत्तीला आवडते मसाला पान

भोपाळ : पान खाण्याची सवय असणाऱ्या अनेक व्यक्ती तुम्ही पाहिल्या असतील; पण एखाद्या हत्तीला दररोज मसाला पान खायला आवडते असे सांगितले तर खरे वाटेल काय? मध्यप्रदेशमधील सागर येथील हा हत्ती पाहिल्यावर मात्र विश्वास बसू शकतो. पान खाणाऱ्या हत्तीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हत्तीच्या माहुताने सांगितले की, १३ ते १४ वर्षांपासून या हत्तीला पान खाण्याची सवय आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी हत्ती पान खात नाही त्या दिवशी तो उदास होतो. दररोज ठरलेल्या वेळी हा हत्ती माहुतासोबत पानाच्या दुकानावर जातो. त्यानंतर पानवाला हत्तीसाठी खास मसाला पान तयार करतो. शहरातील दुसरे पानटपरीवालेही या हत्तीला पान देतात.

Web Title: This elephant favorite spice pan