पाच वर्षांत ३८ हजार भ्रष्ट रेल्वे अधिका-यांना शिक्षा
By Admin | Updated: August 15, 2014 00:11 IST2014-08-14T23:07:03+5:302014-08-15T00:11:33+5:30
विविध प्रकारच्या अनियमितता, भ्रष्टाचारांत गुंतलेल्या ३८ हजार रेल्वे अधिकाऱ्यांना गेल्या पाच वर्षांमध्ये शिक्षा ठोठावण्यात आल्याचे रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी लोकसभेत सांगितले.
पाच वर्षांत ३८ हजार भ्रष्ट रेल्वे अधिका-यांना शिक्षा
नवी दिल्ली : विविध प्रकारच्या अनियमितता, भ्रष्टाचारांत गुंतलेल्या ३८ हजार रेल्वे अधिकाऱ्यांना गेल्या पाच वर्षांमध्ये शिक्षा ठोठावण्यात आल्याचे रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी लोकसभेत सांगितले.
या काळात रेल्वे मंत्रालयाला एकूण ४२ हजार तक्रारी मिळाल्या असून त्याबाबत तपास केल्यानंतर ही शिक्षा ठोठावण्यात आल्याचे त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले. रेल्वेत अनियमितता आणि भ्रष्टाचार आहे याबाबत माझे दुमत नाही. आम्ही त्याला आळा घालण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत आहोत.रेल्वे कर्मचाऱ्यांनी ८८२ कोटी रुपयांची लाच स्वीकारली असून मंत्रालयाने त्यांच्याकडून ६८२ कोटी रुपये वसूल केले आहेत. तक्रारींची शहानिशा किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत आंतर शिस्त निगराणी संघटनेने वेळोवेळी केलेल्या तपासाच्यावेळी अनियमितता उघडकीस आल्या आहेत. पार्सल वाहतुकीतून महसूल वाढविण्यासाठी रेल्वेने पार्सल व्हॅन भाड्याने घेण्याची योजना सुरू केली आहे. याशिवाय पार्सल एक्स्प्रेस रेल्वेची क्षमता वाढविण्यात आली असून त्यात निविंदाच्या माध्यमातून खासगी आॅपरेटर्सना सहभागी करण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)