सगळे घरात, ते पार्कात; लॉकडाऊनची संधी साधून कपलचा खुल्लमखुल्ला रोमान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 14:03 IST2020-04-07T14:00:27+5:302020-04-07T14:03:42+5:30
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. पण तरीही काही लोक या गोष्टीला अजिबात गंभीरतेने घेताना दिसत नाहीत.

सगळे घरात, ते पार्कात; लॉकडाऊनची संधी साधून कपलचा खुल्लमखुल्ला रोमान्स
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देश लॉकडाऊन करण्यात आले आहेत. अमेरिका तर कोरोनाचं केंद्र बनला आहे. अशात ब्रिटनमध्येही अनेक केसेस समोर येत आहे. ब्रिटनमध्ये तर आतापर्यंत 5 हजार 373 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. या महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. पण तरीही काही लोक या गोष्टीला अजिबात गंभीरतेने घेताना दिसत नाहीत.
याचं उदाहरण म्हणून ब्रिटनची राजधानी लंडनमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक कपल कोरोनाची भीती न बाळगता चक्क पार्कमधील झुडपात शारीरिक संबंध ठेवताना दिसत आहे.
द न्यूयॉर्क पोस्ट च्या रिपोर्टनुसार, पाच हजारांपेक्षा जास्त लोकांचा जीव कोरोनामुळे गेलेला असतानाही अनेक लोकांचं घराबाहेर निघणं सुरूच आहे. साऊथ लंडनमध्ये राहणारी एक महिला म्हणाली की, 'दुपारी मी जेव्हा पाय मोकळे करायला बाहेर निघाली होते. तेव्हा मी पाहिले की, एक मूर्ख कपल झुडपात शारीरिक संबंध ठेवत होते'.
महिलेने या घटनेचा 13 सेकंदाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. ती म्हणाली की, 'कोरोनाच्या या संकटात घरात राहणं आणि लोकांचं जीवन वाचवणं हेच जास्त गरजेचं आहे'. अशात या कपलचं अशाप्रकारे वागणं योग्य नाही याआधी डर्बीमध्येही अशीच एक घटना समोर आली होती. येथील कपलही बिल्डींगमध्ये संबंध ठेवून सोशल डिस्टेंसिंगची खिल्ली उडवत होते.