याला म्हणतात हवा...! 'बेगम'ला बिकिनीवर बघाण्यासाठी या कोट्यधीशानं खरेदी केलं अख्खं आयलँड, किंमत जाणून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 13:03 IST2024-09-26T12:59:45+5:302024-09-26T13:03:06+5:30
26 वर्षीय सौदी अल नदाक दुबईतील बिझनेसमन जमाल अल नदाक यांची ब्रिटिश वंशाची पत्नी आहे...

याला म्हणतात हवा...! 'बेगम'ला बिकिनीवर बघाण्यासाठी या कोट्यधीशानं खरेदी केलं अख्खं आयलँड, किंमत जाणून थक्क व्हाल
दुबईतील एका हाऊसवाइफने मोठा दावा केला आहे. आपल्याला समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षित वाटावे, म्हणून आपल्या पतीने आपल्यासाठी एक प्रायव्हेट आयलँड विकत घेतल्याचे एका महिलेने म्हटले आहे. सौदी अल नदाक असे या महिलेचे नाव आहे. सौदी अलने इंस्टाग्रामवर प्रायव्हेट आयलँडचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत तिने लिहिले, "POV : आपली बिकिनी घालण्याची इच्छा होती. यामुळे आपल्या कोट्यधीश पतीने आपल्यासाठी एक आयलँड विकत घेतले."
'बेगम'साठी खरेदी केलं संपूर्ण आयलँड -
26 वर्षीय सौदी अल नदाक दुबईतील बिझनेसमन जमाल अल नदाक यांची ब्रिटिश वंशाची पत्नी आहे. एचटीसोबत बोलताना तिने, आपण 'फुल टाइम हाऊसवाइफ' असल्याचे म्हटले आहे. दुबईमध्ये शिकत असताना या हाय-प्रोफाइल कपलची भेट झाली. त्यांचे लग्न होऊन तीन वर्षं झाली आहेत. सौदी अल नदाक हाऊसवाइफ असल्याशिवाय, एक इंफ्लुएन्सर म्हणूनही ओळखली जाते. तिच्या इंस्टाग्राम आणि टिकटॉक अकाउंटवरून, तिच्या लाइफस्टाइलचा अंदाज येऊ शकतो.
प्रायव्हेट आयलँडवरील जीवन -
पतीने संपूर्ण आयलँड विकत घेतल्यासंदर्भातील सौदी अल नदाकचा हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका आठवड्यात 24 लाखहून अधिक वेला बघितला गेला आहे. माध्यमांसोबत बोलताना सौदी म्हणाली, आम्ही गुंतवणूक म्हणून एक आयलँड विकत घेण्याचा बऱ्याच दिवसांपासून विचार करत होतो. तसेच, तसेच समुद्रकिनाऱ्यावर मला सुरक्षित वाटावे, असे माज्या पतिला वाटते, यामुळे त्यांनी एक आयलँड विकत घेतले.
महत्वाचे म्हणजे, सुरक्षितता आणि गोपनीयतेच्या कारणास्तव सौदीने आयलँडचे खरे लोकेशन सांगितले नाही. "या प्रायव्हेट आयलँडसाठी आपल्या पतीने $50 मिलियन (साधारणपणे, 418 कोटी रुपये) एवढी मोठी रक्कम खर्च केली आहे. तसेच, सुरक्षितता आणि गोपनियतेच्या कारणास्तव आम्ही लोकेशन शेअर करू शकत नाही, मात्र हे आशिया खंडातच आहे आणि याची किंमत $50 मिलियन एवढी आहे," असेही सौदी म्हटले आहे.