शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

दुबईमधील अजब घटना, केवळ 'हा' एक शब्द बोलल्याने ब्रिटिश महिलेला टाकलं तुरूंगात; असं काय म्हणाली ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 10:27 IST

ही बातमी सर्वांसाठीच महत्वाची आहे. कारण तुम्ही कोणत्याही देशात जात असाल तर त्या देशांचे नियम-कायदे तुम्हाला माहीत असायला हवे. जगात यूएईसारखेही देश आहेत.

जगात काही अरब देश हे आपल्या कठोर नियमांसाठी चांगलेच चर्चेत असतात. या देशात एक गंमत तुम्हाला अनेक वर्षांसाठी तुरूंगात पाठवू शकते. अशीच एक घटना दुबईमधून समोर आली आहे. इथे एका ब्रिटिश महिलेला गंमत करणं चांगलंच महागात पडलं आहे.

देश सोडताना घेतलं ताब्यात

या ब्रिटिश महिलेला देश सोडून जाताना एअरपोर्टवरून ताब्यात घेण्यात आलं होतं. कारण तिच्यासोबत फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका यूक्रेनी तरूणीने तक्रार केली होती की, तिला या ब्रिटिश महिलेने 'F*** YOU' असं म्हटलं होतं. केवळ या शब्दामुळे ब्रिटिश महिलेला आता २ वर्षांसाठी तुरूंगात रहावं लागणार आहे.  ( हे पण वाचा : बाप रे बाप! दुसऱ्या तरूणीसोबत लग्न करणार होता बॉयफ्रेन्ड, महिलेने हत्या करून कुत्र्याला खाऊ घातलं....)

व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवण्याची शिक्षा

ब्रिटिश महिला ब्रायटोनचं वय ३१ वर्षे आहे आणि ती ग्लूकेस्टरशायर(इंग्लंड) बेस्ड  कंपनीमध्ये एचआर मॅनेजर आहे. तिच्यासोबत फ्लॅटमध्ये एका यूक्रेनी तरूणी राहत होती. ब्रिटिश महिलेनुसार ती फार चंचल, चांगली मुलगी आहे. पण ऑक्टोबर महिन्यात ती ब्रिटिश महिला यूक्रेनी तरूणीवर चिडली आणि व्हॉट्सअ‍ॅपवरून 'F*** You' असा मेसेज पाठवला होता. कारण लॉकडाऊन दरम्यान तिच्या रूममेटने डायनिंग टेबलवर ऑफिसचं काम केलं होतं. पण तिला हे माहीत नव्हतं की, हा दोन मिनिटांचा राग तिला किती महागात पडणार आहे.

एअरपोर्टवर अटक

ब्रायटोनने सांगितले की, तिने तिच्या फ्लॅटमेटला ऑक्टोबर महिन्यात तो मेसेज पाठवला होता. आणि आता ती दुबई सोडून नेहमीसाठी आपल्या परिवाराकडे ब्रिटनला जात होती. तिचं साहित्यही पाठवलं गेलं होतं. व्हिसाचा काळ संपला होता. तिने फ्लाइटचं तिकिट काढलं आणि एअरपोर्टला पोहोचली.

रूममेटने केस परत घेण्यास दिला नकार

एअरपोर्टवर ती आत जात असतानाच तिला अडवण्यात आलं. तिला सांगण्यात आलं की, तुझ्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा सगळा प्रकार समजून घेतल्यावर ब्रिटिश महिलेने यूक्रेनी तरूणीची माफी मागितली आणि केस परत घेण्याची विनंती केली. पण तसं करण्यास तरूणीने नकार दिला. आता ब्रिटिश महिलेला २ वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. ही महिला २०१८ पासून दुबईमध्ये राहत होती. पण कधीच तिला काही समस्या आली नव्हती.

ही बातमी सर्वांसाठीच महत्वाची आहे. कारण तुम्ही कोणत्याही देशात जात असाल तर त्या देशांचे नियम-कायदे तुम्हाला माहीत असायला हवे. जगात यूएईसारखेही देश आहेत. जिथे तुम्हाला छोटीशी गंमत करणंही महागात पडू शकतं. 

टॅग्स :DubaiदुबईCrime Newsगुन्हेगारी