शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

बाबो! दारुच्या नशेत या महिलेचा सुटला ताबा, रात्री केलं असं काम की आयुष्यभर होतोय पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 14:02 IST

इंग्लंडमधील एका महिलेने नशेत असं काही केलं की शुद्धीवर आल्यानंतर तिला स्वतःलाच धक्का बसला. महिलेनं मद्यधुंद अवस्थेत तिच्या शरीरावर अज्ञात पुरुषाचं नाव गोंदवलं.

बर्‍याचदा दारूच्या नशेत असलेले लोक अशा गोष्टी करतात ज्या अतिशय हैराण करणाऱ्या असतात (Weird Act of Drunk People). नशेत काही लोक इतरांना मारायला लागतात, काही नाचायला, काही गायला आणि काही जास्त हसायला किंवा रडायला लागतात. पण इंग्लंडमधील एका महिलेने नशेत असं काही केलं की शुद्धीवर आल्यानंतर तिला स्वतःलाच धक्का बसला. महिलेनं मद्यधुंद अवस्थेत तिच्या शरीरावर अज्ञात पुरुषाचं नाव गोंदवलं (Woman Tattooed Strangers Name on Hip).

इंग्लंडमधील हेरफोर्ड येथे राहणारी ३२ वर्षीय कायली विल्यम्स आता २ मुलांची आई आहे, परंतु जेव्हा ती अविवाहित होती तेव्हा ती तिच्या मित्रांसोबत खूप मजा करायची आणि फिरायला जायची. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, २०१२ मध्ये कायली तिच्या गर्ल गँगसोबत स्पेनमधील मगलुफ शहरात गेली होती, जिथे त्यांनी मजेत पार्टी केली. पण एक दिवशी त्यांची मजा शिक्षेत बदलली.

कायली आणि तिची मैत्रीण पार्टी करून पबमधून बाहेर आल्या, तेव्हा त्या एका टॅटू शॉपच्या बाहेर पोहोचल्या. जिथे काही स्पॅनिश पुरुष उभे होते. ते पुरुष या दोघींसोबत बोलू लागले आणि मग एका व्यक्तीने त्यांना एक विचित्र चॅलेंज दिलं. त्याने कायलीला तिच्या हिपवर आपल्या नावाचा टॅटू काढण्याचं चॅलेंज दिलं. कायली शुद्धीवर नव्हती, म्हणून लगेचच तिने या व्यक्तीला होकार दिला. पण तिने अट ठेवली की टॅटू काढण्याचे पैसे या व्यक्तीलाच द्यावे लागतील.

हे ऐकून त्या व्यक्तीलाही आश्‍चर्य वाटलं, पण तोही मस्ती करण्याच्या मूडमध्ये होता, म्हणून त्याने होकार दिला. कायलीने तिच्या हिपवर 'डॅनियल फोर्ड' नावाचा टॅटू काढला आहे. या गोष्टीला १० वर्ष झाले आहेत, तिला डॅनियलचा चेहराही आठवत नाही किंवा त्याच्याबद्दल काहीच माहिती तिला नाही. तो तिच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होता. अशा स्थितीत आपल्या अंगावर एखाद्या अनोळखी व्यक्तीचा टॅटू गोंदवून घेतल्यानं तिला आजही हसूही येतं आणि पश्चातापही होतो. तो प्रसंग आठवून तिचे मित्र-मैत्रिणी आजही तिच्यावर हसतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके