शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

...तर नदीमध्ये बुडाली असती 'ही' चिमुकली, श्वानानं चलाकीनं वाचवला जीव; पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 8:49 PM

असे म्हटले जाते, की माणसाचे आणि श्वानाचे नाते फार जुने आहे. हा प्राणी आपली मैत्री केवळ प्राण्यांसोबतच नाही, तर माणसासोबतही तेवढीच घट्ट करतो. तो आपली जबाबदारीही चांगल्या प्रकारे ओळखतो. (Viral video)

मुंबई - सोशल मिडियाच्या जगतात सातत्याने प्राण्यांसंदर्भातील व्हिडिओज व्हायरल होत असतात. अशा व्हिडिओजना युझर्सचीही जबरदस्त पसंती मिळते. हे व्हिडिओ एवढे गमतीशीर असतात की याची सोशल मिडियावर जबरदस्त चर्चा रंगते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मेडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिला, की आपल्यालाही कळेल, श्वानाला (कुत्रा) (Dog) माणसाचा सर्वाधिक प्रामाणिक मित्र का  म्हटले जाते.

व्हिडिओची सोशल मिडियावर प्रचंड चर्चा - असे म्हटले जाते, की माणसाचे आणि श्वानाचे नाते फार जुने आहे. हा प्राणी आपली मैत्री केवळ प्राण्यांसोबतच नाही, तर माणसासोबतही तेवढीच घट्ट करतो. एवढेच नाही, तर तो आपली जबाबदारीही चांगल्या प्रकारे ओळखतो. याच संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड चर्चेत आहे. नव्हे हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल देखील होत आहे. 

रस्त्यावरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचली 139 वर्ष जुनी दोन मजली इमारत, व्हिडिओ व्हायरल

एक छोटी मुलगी आणि एका पाळीव श्वानाचा व्हिडिओ सध्या लोकांत चर्चेचा विषय आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे, की एक मुलगी चेंडू आणण्यासाठी नदीत जाण्याचा प्रयत्न करते. मात्र, तेथेच जवळ बसलेला श्वान तिला वारंवार मागे ओढतो. एवढेच नाही, तर मुलगी नाराज होऊ नये, म्हणून तो स्वतःच नदीपात्रात उतरून तिचा बॉल आणतो.

बातमी लिहण्यापर्यंत तब्बल 33.8 हजार युझर्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच या व्हिडिओला जवळपास 5 हजार लाइक्स आले आहेत. तर 924 जणांनी हा व्हिडिओ रीट्विट केला आहे. अनेक जण या व्हिडिओवर प्रतिक्रियाही देत आहेत.

हाय हिल्स घालून ती धाव धाव धावली; कधीही पाहिला नसेल असा स्टंट, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल

जणावरांना प्रेमाची भाषा समजते -हा व्हिडिओ नेमका कुठला? यासंदर्भात अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र या कुत्र्याची समजदारी आणि प्रामाणिकपणाची यूझर्स तारीफ करत आहेत. अनेक युझर्सनी लिहिले आहे, की या कुत्र्याने समजदारी आणि सतर्कता दाखवली नसती, तर वाईट घटना घडण्याची शक्यता होती. तसेच अनेकांनी लिहिले आहे, की जणावरांना प्रेमाची भाषा फार चांगल्या प्रकारे समजते. 

टॅग्स :dogकुत्राSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया