शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना पुशअप्स मारताना पाहून कुत्र्यालाही राहवलं नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 18:25 IST

इतर प्राण्यांपेक्षा कुत्रा हा माणसाच्या जास्त जवळ येतो आणि मित्राप्रमाणे वागु लागतो, हेच या व्हिडीयोतून सिध्द होते.

ठळक मुद्देमाणसं व्यायाम करण्यासाठी आळस करतात. मात्र या कुत्र्यामुळे माणासाला प्रेरणा मिळाली आहे. कामाला जाण्याआधी पुश अप्स करणं किती गरजेचं आहे, हा संदेश या व्हिडिओतून मिळतोय.हा गंमतीदार व्हिडिओ सोशल मीडियाव धुमाकुळ घालत असून बराच शेअर केला जातोय.

गल्फ - प्राण्यांना माणसांचा लळा लागला की ते लगेच माणसाळतात. मग पोलिसांचा कुत्रा असला तरी त्याला पोलिसांचा लळा लागेलच ना. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. पोलीस व्यायामासाठी पुशअप्स मारत असताना त्यांच्या कुत्र्यानेही पुशअप्स मारायला सुरुवात केली. पोलिसांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला असता क्षणार्धात व्हायरलही झालाय. 

आणखी वाचा - लायकाच्या प्रवासाची 60 वर्षे; अंतराळात जाणारा पहिला प्राणी

गल्फ शोर्स पोलीस विभागाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. निट्रो असं या कुत्र्याचं नाव असून तो २ वर्षांचा आहे. फेब्रुवारी महिन्यात डच अलाबामाच्या गल्फ शोर्सच्या पोलीस विभागात दाखल झाला होता. त्यानंतर तो हळूहळू त्यांच्यात रुळू लागला. आपल्या ऑफिर्ससना व्यायाम करताना पाहिल्यावर त्यानेही व्यायामाला सुरुवात केली. पुशअप्स मारताना आय ऑफ दि टायगर हे गाणंही लागलं आहे. हा व्हिडिओ शेअर करताना पोलिसांनी लिहिलं आहे की, निट्रो त्याचे पोलीस ऑफिसर कोवान आणि ऑफिसर हैनकॉक वॉर्म अप करत असून ते चोरांना पकडण्यात सज्ज होत आहेत.

आणखी वाचा - आश्चर्यकारक - सिंगापूरच्या प्राणी संग्रहालयातील हंसाचं पिल्लू चक्क घालतो शूज

आणखी वाचा -  या देशात प्राणी चालवतात राजकीय सत्ता

गेल्या रविवारी हा व्हिडिओ त्यांनी शेअर केला. अवघा ७ सेंकदाचा असलेला व्हिडिओ ८ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून २६ हजारपेक्षा अधिक नेटीझन्सकडून सोशल मीडियावर शेअर केला आहे. माणसं व्यायाम करण्यासाठी आळस करतात. मात्र या कुत्र्यामुळे माणासाला प्रेरणा मिळाली आहे. कामाला जाण्याआधी पुश अप्स करणं किती गरेजचं आहे, असाच उद्देश या व्हिडिओतून मिळतोय, अशा काहीशा प्रतिक्रिया नेटीझन्सने दिल्या आहेत. पोलिसांना त्यांचं काम फत्ते करण्यासाठी खूप मेहनत करावी, त्यासाठी त्यांना व्यायामाची नितांत आवश्यकता असते. त्यामुळे आपल्या ऑफिर्ससना रोज रोज पुशअप्स मारताना पाहिल्यावर निट्रोलाही पुशअप्स मारावसे वाटले असेल. त्याचा हा व्हिडिओ पाहताना थोडीशी गंमतही वाटते. निट्रो पुशअप्स मारताना एक एक पाऊल पुढे जाताना दिसतोय. यात थोडीशी गंमत वाटत असली तरीही प्रत्येकाने असे पुशअप्स मारणं गरजेचं आहे. 

सौजन्य - www.dailymail.co.uk

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयPoliceपोलिसdogकुत्रा