शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कधी विचार केलाय, ट्रॅक्टरचे पुढचे टायर छोटे आणि मागचे मोठे का असतात? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 17:03 IST

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, येथील सुमारे ७० टक्के लोक अजही शेतीवर अवलंबून आहेत. आज शेतीमध्ये ट्रॅक्टरचे मोठे योगदान आहे. अनेक महत्त्वाची कामे शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने करतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, ट्रॅक्टरचे पुढचे टायर छोटे आणि मागचे टायर मोठे व टोकदार का असतात.

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, येथील सुमारे ७० टक्के लोक अजही शेतीवर अवलंबून आहेत. आज शेतीमध्ये ट्रॅक्टरचे मोठे योगदान आहे. अनेक महत्त्वाची कामे शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने करतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, ट्रॅक्टरचे पुढचे टायर छोटे आणि मागचे टायर मोठे व टोकदार का असतात.

दोन्ही टायरचे उद्देश वेगळे - खरे तर, ट्रॅक्टरच्या पुढच्या आणि मागच्या टायरचा उद्देश वेग वेगळा असतो. यात ट्रॅक्टरचे हँडलिंग, त्याची पकड, बॅलेंस, तेलाचा वापर, आदी अनेक गोष्टींचा समावेश आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन ट्रॅक्टरच्या टायरची रचना करण्यात आली आहे.

...म्हणून छोटे असतात ट्रॅक्टरचे पुढचे टायर - पुढच्या छोट्या टायरच्या सहाय्याने ट्रॅक्टरची दिशा ठरवली जाते. हे टायर थेट स्टेअरिंगला जोडले गेलेले असतात. स्टेयरिंग फिरवल्यानंतरच ते फिरतात. या टायर्सची भूमिका केवळ एवढीच असते. याशिवाय हे टायर छोटे असल्याने यांना वळवणे सोपे जाते. म्हणजेच वळणावर जागा कमी असली तरीही ते फिरवले जाऊ शकतात. यासाठी पुढच्या बाजूला अधिक जागेची आवश्यकता लागत नाही. याशिवाय, लहान टायरमुळे इंजिनवरही कमी ताण येतो. यामुळे तेलही कमी लागते.

...म्हणून ट्रॅक्टरचे मागचे टायर असतात मोठे - चिख्खल अथवा मातीत कार आणि बाईकच्या तुलनेत ट्रॅक्टर सहजपणे काम करते. कमी ट्रॅक्शनमुळे कार किंवा दुचाकी चिखलात फसतात. पण मागचे टायर मोठे असल्याने ट्रॅक्टर सहजपणे निघून जाते. ट्रॅक्टरला मागच्या बाजूला मोठे टायर लावल्याने टायर चिखलात फसत नाही आणि चांगली पकड कायम ठेवते. याचबरोबर ट्रॅक्टरचे इंजिन पुढच्या बाजूला असते. यामुळे वजन बॅलेंस करण्यासाठीही मागच्या बाजूला मोठे टायर लावणे आवश्यक असते. याशिवाय मागच्या बाजूला दोन्ही मोठे टायर असल्याने ते लोड ओढतान ट्रॅक्टर पुढून बाजूने वर होऊ देत नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेFarmerशेतकरीtechnologyतंत्रज्ञान