काय सांगता! मनुष्यांआधी चंद्रावर डायनासॉर पोहोचले होते, जाणून घ्या हे नेमकं झालं कसं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 10:36 IST2021-01-25T10:33:06+5:302021-01-25T10:36:54+5:30
हे पुस्तक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतं. ब्लॉगर मॅट ऑस्टिनने या पुस्तकातील काही भाग ट्विटरवर शेअर केला आहे.

काय सांगता! मनुष्यांआधी चंद्रावर डायनासॉर पोहोचले होते, जाणून घ्या हे नेमकं झालं कसं...
चंद्रावर पहिलं पाउल ठेवणाऱ्या माणसाचं नाव होतं नील आर्मस्ट्रॉंग. पण तुम्हाला माहीत आहे का की, मनुष्यांआधी चंद्रावर डायनासॉर पोहोचले होते? असे मानले जाते की, ६.६ कोटी वर्षांआधी डायनासॉर चंद्रावर पोहोचले होते. चंद्रावर डायनासॉरचे काही अवशेष आढळण्याची शक्यता पीटर ब्रॅनन यांच्या २०१७ साली आलेल्या 'द एंड्स ऑफ द वर्ल्ड' पुस्तकात वर्तवण्यात आली आहे. हे पुस्तक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतं. ब्लॉगर मॅट ऑस्टिनने या पुस्तकातील काही भाग ट्विटरवर शेअर केला आहे.
असे मानले जाते की, एस्टरॉइड पृथ्वीला धडकल्याने डायनासॉर लुप्त झाले होते. या पुस्तकात दावा करण्यात आला आहे की, जेव्हा हा एस्टरॉइड पृथ्वीला धडकला होता तेव्हा मलबा चंद्रावर जाऊन पडला. हा एस्टररॉइड माउंट एव्हरेस्टपेक्षाही मोठा होता. एखाद्या बंदुकीच्या गोळीपेक्षाही वेगाने तो पृथ्वीवर आदळला होता.
(Image Credit : BBC)
या पुस्तकात जियोफिजिसिस्ट मारियो रेबेोलेडो यांच्या हवाल्याने लिहिण्यात आले की, एस्टरॉइडचं एटमॉस्फेरिक प्रेशर इतकं जास्त होतं की, तो पृथ्वीवर धडकण्यापूर्वी जमिनीवर खड्डा पडत होता.
या पुस्तकात लिहिण्यात आले आहे की, एस्टरॉइड इतका विशाल होता की, वायुमंडळ आल्यावरही कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नव्हतं. ब्रॅनन यांचं मत आहे की, एस्टरॉइडमुळे निर्माण झालेल्या दबावामुळे वर आकाशात हवेऐवजी वॅक्यूम तयार झालं होतं. होऊ शकतं की, डायनासॉरची हाडं चंद्रावर सापडतील.
रिबोलेडोने लिहिले की, एस्टरॉइड पृथ्वीवर धडकल्यावर १२० मैल खोल खड्डा पडला होता. डोंगरांची वाफ झाली होती आणि आकाशात अब्जो टन सल्फर आणि कार्बनडायऑक्साइड पसरलं होतं.