शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भूतानमधील घरांच्या भिंतीवर पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टचं चित्र का असतं? जाणून घ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 14:43 IST

ऐकायला हे जरा विचित्र वाटतं. पण तुम्ही जर तिथे गेलात तर येथील घरांवर तुम्हाला मानवी लिंगाच्या पेंटिंग्स आणि ग्राफिटी दिसतील. या पेंटिंग्स बौद्ध पंरपरेच्या साक्षीदार मानल्या जातात. 

जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये काहीना काही अशा गोष्टी असतात ज्या वाचून सगळेच हैराण होतात. अशीच भूतान या आपल्या शेजारील देशाबाबत एक गोष्ट नेहमीच चर्चेत असते. येथील लोक पूर्वीपासून  मानवी लिंगाची म्हणा Penis ची म्हणा पूजा करतात. ऐकायला हे जरा विचित्र वाटतं. पण तुम्ही जर तिथे गेलात तर येथील घरांवर तुम्हाला मानवी लिंगाच्या पेटिंग्स आणि ग्राफिटी दिसतील. या पेंटिंग्स बौद्ध पंरपरेच्या साक्षीदार मानल्या जातात.  

या लिंगाच्या पेंटिंग्स वेगवेगळ्या भडक रंगांमध्येही केल्या जातात. काहींवर तर गिफ्टसारखी रेबिनही बघायला मिळते. पण या लिंगामध्ये एक कॉमन गोष्ट आहे. ती म्हणजे ही सर्वच लिंगे उभी आहेत. 

इथे असे मानले जाते की, लिंगाच्या प्रतिमेने वाईट आत्मांना दूर राहतात आणि द्वेषाची भावनाही दूर राहते. त्यामुळेच अनेक घरांवर या पेंटिंग्स बघायला मिळतात. 

तिबेटमधील दृक्पा कुंले नावाचा एक भिक्खु भूतानमध्ये आला होता. तो मद्यसेवन करत होता, महिलांसोबत संबंध ठेवत होता. म्हणजे तो कामुकतेच्या अधीन होता. या माध्यमातून तो धर्माचं तात्पर्य समजावत होता. त्याच्या या कारनाम्याच्या अनेक पौराणिक कथाही आहेत. त्याच्यामुळेच येथील भिंतींवर लिंगाच्या प्रतिमा तयार करण्यास सुरूवात झाली होती. कारण त्याला इन्फर्टिलिटीचा देव असंही म्हटलं जायचं.

दृक्पा कुंलेचे किस्से वादग्रस्त होते. तो म्हणायचा की, 'मडक्याच्या तळाला चांगली दारू असते आणि जीवनाचा खरा आनंद नाभिच्या खालीच मिळतो'.

हा भिक्खु अनेक दिवस मद्यसेवन करत कुमारीकांसोबत शारीरिक संबंध ठेवत असे. तो अपरंपरागत बौद्ध धर्माचा प्रचार करत होता. त्याने भक्तांना शिक्षा दिली होती की,  मनुष्याने सांसारीक तृष्णेपासून दूर राहिलं पाहिजे आणि साधं जीवन जगलं पाहिजे. साध्या जीवनाशी त्याचा अर्थ होता की, आध्यात्माचा शोध आणि कामुकतेची उदारता. हा भिक्खु भक्तांना आशीर्वादाच्या रूपात त्यांच्यासोब संभोग करत होता.

भूतानच्या काही भागांमध्ये आजही एका प्रथेनुसार एका जत्रेत एक खास समुदाय अशा शिडीचा वापर करतात ज्याचा आकार लिंगासारखा असतो. पौराणिक कथांमध्ये असे सांगितले आहे की, देव दोराच्या मदतीने या शिडीवरून खाली येऊन आरोग्यता आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात.

टॅग्स :BhutanभूतानInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके