कुत्र्यामुळे झालं बाप-लेकाचं भांडण, एकमेकांवर गोळीबार करून दोघेही जागीच ठार....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 10:54 IST2020-12-26T10:49:57+5:302020-12-26T10:54:27+5:30
शनिवारी Kevlin James Coker त्यांचा मुलगा Nicholas Coker च्या अलबामातील Wagersville येथील घरी गेले होते. त्यांनी त्यांच्या मुलावर गोळी झाडली.

कुत्र्यामुळे झालं बाप-लेकाचं भांडण, एकमेकांवर गोळीबार करून दोघेही जागीच ठार....
अनेक लोकांची भांडणं होतात. काही भांडणं इतकी टोकाला जातात की, लोक आयुष्यभर एकमेकांशी बोलत नाही. बाप-लेकातही अशी भांडणं होतात. असंच एक भांडण बाप-लेकाच्या जीवावर बेतलं आहे. अमेरिकेतील ही घटना असून एक ६० वर्षीय वडील आणि ३२ वर्षीय मुलात कुत्र्यावरून भांडण झालं आणि एकमेकांवर गोळी झाडली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
शनिवारी Kevlin James Coker त्यांचा मुलगा Nicholas Coker च्या अलबामातील Wagersville येथील घरी गेले होते. त्यांनी त्यांच्या मुलावर गोळी झाडली. तेव्हाच मुलानेही वडिलांवर गोळी झाडली. Washington County Sheriff रिचर्डनने सांगितलं की, मुलाच्या वडिलाच्या मानेवर गोळी लागली होती.
मेट्रोने दिलेल्या वृत्तानुसार, बाप-लेकाच्या भांडणामागे कुत्रा हे कारण होतं. केलविन ज्युनिअरने(मुलगा) दोन कुत्र्यांना मारलं होतं. हे दोन्ही कुत्रे त्यांच्या परिवारातीलच होते. पिट बुल प्रजातीचे हे कुत्रे होते. यातील एकाने त्याच्या प्रेयसीच्या मुलावर हल्ला केला होता. दोनपैकी एक कुत्रा त्याच्या वडिलाचं होता.
मिळालेल्या माहितीनुसार आधी मुलगा आणि वडिलात वाद झाला होता. त्यानंतर मुलगा हवेत शॉर्टगन रोखून होता. त्यानंतर त्याच्या वडिलान आपली गम काढली आणि मुलावर गोळी झाडली. याचदरम्यान मुलानेही वडिलावर गोळी झाडली.
निकोलसची प्रेयसी Ariel Anderson ने फेसबुकवर काही वेगळंच लिहिलं आहे. तिने लिहिले की, निकला त्याच्या वडिलाने मारलं आहे. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली. तिने सांगितल की, निक तिच्या मुलीला वाचवत होता. पण तपासात असं काहीच समोर येत नाहीये की, वडिलाने स्वत:वर गोळी झाडून घेतली.