शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

लग्नाआधी जळालं होतं नवरदेवाचं शरीर, नवरीने हॉस्पिटलमध्ये येऊन बांधली लग्नाची गाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 10:27 IST

Bride Groom News: कॉब म्हणाला की, "मी पाहिलं की, माझ्या हाताची त्वचा वेगळी झाली आहे आणि इतर ठिकाणीही भाजलं आहे. मला असं वाटलं होतं की, माझा अंत जवळ आला आहे'.

Bride Groom News:  लग्नाच्या दिवशीच अनेक दुर्घटना घडल्याच्या दुर्दैवी घटना नेहमीच समोर येत असतात. अशात दोन्ही परिवार टेंशनमध्ये असतात. अशीच एक घटना समोर आली. एका नवरदेवाचं शरीर लग्नाआधी 32 टक्के भाजलं. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यामुळे लग्न रखडलं. मात्र, त्याच्या पार्टनरने हॉस्पिटलमध्ये येऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांचं लग्न जॉर्जिया हॉस्पिटलच्या बर्न यूनिटमध्ये पार पडलं.

न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, नवरदेव प्रेस्टन कॉब जो इराक युद्धातील एक सन्मानित सैनिक होता, त्याने गेल्या सप्टेंबरमध्ये साखरपुडा केल्यानंतर या 22 जुलैला लग्नाचा निर्णय घेतला होता. पण लग्नाआधी 30 जूनला प्रेस्टन एका रासायनिक गळतीचा शिकार झाला. ज्यामुळे तो 32 टक्के भाजला. 

कॉब म्हणाला की, "मी पाहिलं की, माझ्या हाताची त्वचा वेगळी झाली आहे आणि इतर ठिकाणीही भाजलं आहे. मला असं वाटलं होतं की, माझा अंत जवळ आला आहे'.

कथितपणे नवरदेवाची स्थिती इतकी गंभीर होती की, त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. जेव्हा कॉब केमिकलमध्ये पडला तेव्हा तापमान 1,500 डिग्री फॅरेनहाइट होतं. ज्यामुळे त्याला त्याच्या पायाची 9 बोटं गमवावी लागली. डॉक्टरांना त्याच्या डाव्या हाताची चार बोटेही कापावी लागली. प्रेस्टनला भीती होती की, त्याची पार्टनर आता त्याच्यासोबत लग्न करणार नाही. 

पण त्याला चुकीचं ठरवत तनेशाने त्याची साथ दिली. जसा कॉब ठीक झाला त्यांची लग्नाची तारीख जवळ आली होती. परिवारातील लोक, मित्र यांच्या उपस्थितीत दोघांनी हॉस्पिटलमध्येच लग्न केलं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल