शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

घराचं कारपेट उचलताच जोडप्याला दिसला एक गुप्त दरवाजा, आत जाऊन पाहिलं तर बसला धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 18:26 IST

नवीन खरेदीदाराला घराच्या खाली लपलेलं दुसरं जग दिसलं. हे घर १९०० च्या सुमारास बांधलं गेलं. इतक्या वर्षांनंतर घरही कोसळण्याच्या मार्गावर होतं. मात्र या घराच्या नूतनीकरणादरम्यान असं काही घडलं की सगळेच आश्चर्यचकित झाले.

लोकांसाठी त्यांच्या जुन्या गोष्टी खूप मौल्यवान असतात. ते सहाजिकच आहे, कारण शेवटी या जुन्या गोष्टी त्यांच्या मागील पिढ्यांपासून आलेल्या असतात. लोक त्यांचा वारसा जपतात. मात्र, कधी कधी लोकांना इच्छा नसतानाही आपल्या या गोष्टी विकाव्या लागतात. असंच कोणीतरी आपला वडिलोपार्जित वारसा यूकेमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला विकला. पण नंतर नवीन खरेदीदाराला घराच्या खाली लपलेलं दुसरं जग दिसलं. हे घर १९०० च्या सुमारास बांधलं गेलं. इतक्या वर्षांनंतर घरही कोसळण्याच्या मार्गावर होतं. मात्र या घराच्या नूतनीकरणादरम्यान असं काही घडलं की सगळेच आश्चर्यचकित झाले..

बेन मन आणि त्यांची पत्नी किम्बरले यांनी हे घर २०२० मध्ये विकत घेतलं होतं. त्यांनी गेल्या वर्षी या घराच्या दुरुस्तीचं काम सुरू केलं. यादरम्यान, जेव्हा त्यांनी आपल्या बेडरूमच्या खाली पडलेलं कार्पेट साफ करण्यासाठी उचललं, तेव्हा या घरातील रहस्याचा खुलासा झाला. कार्पेटखालील फरशी लाकडाची होती जी तुटलेली होती. त्यामुळे कार्पेट उचलताच त्याखाली एक शिडी दिसली. ही शिडी नेमकी कुठे जाते, याची दोघांनाही कल्पना नव्हती. (Couple Found Secret Room in Old House)

३९ वर्षाच्या बेनने या शिडीवरुन खाली उतरण्याचा निर्णय घेतला. खाली जाताच त्यांना एक वेगळंच जग दिसलं. खाली विटांनी बनवलेली एक रूम होती, ज्यात आधी वाईन एकत्र करून ठेवल्या जात असे. बेनने द मिररला सांगितलं की जर त्याची नजर या तुटलेल्या फरशीवर गेली नसती तर या रूमबाबत कदाचित कधीच खुलासा झाला नसता. हा भाग बऱ्याच प्रमाणात सडलेला होता आणि पाणी तसंच ओल्यामुळे इथे दुर्गंधीही होती. मात्र, या कपलने आता हा भाग पूर्णपणे स्वच्छ केला आहे.

कपलने याचं नाव मन गुफा असं ठेवलं आहे. बेनने सांगितलं की ही रूम अनेक जुन्या वस्तूंनी रिनोवेट केली आहे. सगळ्या मोठी बाब म्हणजे या घराचं पूर्ण रिनोवेशन या कपलनेच केलं आहे. यामुळे त्यांचे भरपूर पैसे वाचले आहेत. या सिक्रेट रूमबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके