CoronaVirus: बंगळुरूतलं काम सांगून बँकॉकमध्ये मुक्काम; पोलीस दारी येताच नवऱ्यांची दाणादाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 13:04 IST2020-04-01T13:02:26+5:302020-04-01T13:04:36+5:30

Coronavirus कोरोनामुळे पोलिसांनी घर गाठलं; पत्नींसमोरच नवऱ्यांचं भांड फुटलं

coronavirus men lied wifes and went for bangkok vacation exposed after police came with quarantine orders kkg | CoronaVirus: बंगळुरूतलं काम सांगून बँकॉकमध्ये मुक्काम; पोलीस दारी येताच नवऱ्यांची दाणादाण

CoronaVirus: बंगळुरूतलं काम सांगून बँकॉकमध्ये मुक्काम; पोलीस दारी येताच नवऱ्यांची दाणादाण

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. परदेशातून परतलेल्या अनेकांच्या संपर्कात स्थानिक व्यक्ती आल्यानं कोरोनाचा वेगानं संसर्ग झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जानेवारीपासून देशात आलेल्यांची चौकशी सुरू आहे. त्यांना निरीक्षणाखाली ठेवलं जात आहे. अनेकांना १४ दिवस होम क्वॉरेंटाईन राहण्याचे आदेश दिले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर एक ट्विट व्हायरल झालं आहे. अभिजीत नावाच्या व्यक्तीनं हे ट्विट केलं असून त्यामध्ये दोन फोटो आहेत. 

अभिजीत यांनी ट्विट केलेल्या फोटोत काही लोक आणि पोलीस दिसत आहेत. यामध्ये दोन पुरुष दिसत असून त्यातला एक कॅमेऱ्याच्या दिशेनं बोट दाखवून संताप व्यक्त करतो आहे. फोटोत पोलीस दोन व्यक्तींची चौकशी करतानादेखील दिसत आहेत. अभिजीत यांनी घडलेला प्रकार ट्विटमध्ये लिहिला आहे. हा प्रकार वाचून अनेकांना हसू अनावर झालं आहे. या ट्विटला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले असून कित्येकांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे.



'बंगळुरूत कामासाठी जात असल्याचं पत्नींना सांगून दोन पती बँकॉकला गेले होते. हे दोघे परतल्यावर पोलिसांनी त्यांचं घर गाठलं. त्यांच्या घरी क्वॉरेंटाऊनच्या नोटीस लावण्यात आल्या. दोघांच्या प्रवासाची माहिती घेऊन पोलीस त्यांच्या घरी पोहोचले होते. दोघांना क्वॉरेंटाईन का केलं जातंय, हेदेखील पोलिसांनी त्यांच्या पत्नींना समजावून सांगितलं.', अशा शब्दांमध्ये अभिजीत यांनी घडलेला प्रकार ट्विटमध्ये लिहिला आहे. यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या पतींना आयुष्यभर होम क्वारेंटाईन राहावं लागेल, आता कोरोना घरात आणि संसारातदेखील घुसू लागलाय, अशा प्रतिक्रिया अनेकांनी या ट्विटवर केल्या आहेत.

Web Title: coronavirus men lied wifes and went for bangkok vacation exposed after police came with quarantine orders kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.