शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

कंडोम आणि बरंच काही...फ्लाइट अटेंडेंटने सांगितलं, प्रवाशी विमानात काय काय सोडून जातात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 14:28 IST

एका यूजरने विचारलं की, 'तुम्ही आतापर्यंत फ्लाइटमध्ये सगळ्यात विचित्र बाब काय बघितली?

विमानातील वेगवेगळ्या अजब गोष्टी समोर येत असतात. असाच एक अजब खुलासा आता झाला आहे. एका फ्लाइट अटेंडेंटने सांगितलं की, लोक विमानात काय काय सोडून जातात. ती 25 वर्षापासून अमेरिकेतील एका एअरलाईनसाठी फ्लाइट अटेंडेंट म्हणून काम करते. महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर Ask Me Anything ‘AMA’ सेशन केलं. रेडिटवर ‘Wnflyguy’ नावाच्या यूजरने ‘AMA’ कम्युनिटीवर लिहिलं की, मी अमेरिकेतील एका मुख्य एअरलाईन्समध्ये फ्लाइट अटेंडेंट आहे. मी 25 वर्षापासून काम करते. काहीही विचारू शकता.

एका यूजरने विचारलं की, 'तुम्ही आतापर्यंत फ्लाइटमध्ये सगळ्यात विचित्र बाब काय बघितली? यावर तिने उत्तर दिलं की, मी वापरले गेलेले कंडोम, घाणेरडे अंडरविअर महिला आणि पुरूष दोघांचेही, वापरलेले टेम्पॉन, आता  केवळ काही गोष्टींचीच नावे सांगितली'. एका दुसऱ्या यूजरने विचारलं की, 'काय तुम्हाला सन्मान मिळाला, जेव्हा तुम्ही एखाद्या नशेत असलेल्या व्यक्तीला रोखलं किंवा एखाद्याची हरवलेली वस्तू परत केली तेव्हा'? यावर ती म्हणाली की, 'काही लोक माझ्यावर थुंकले आणि काहींनी माझ्यासोबत भांडण केलं'.

महिलेने हेही सांगितलं की, तिने अनेक लोकांना फ्लाइटमध्ये धुम्रपान करतानाही पाहिलं आहे. अशा प्रवाशांना पकडण्यासाठी पोलिसांना लॅंडिंगआधी सूचना दिली जाते. ही नोकरी करत असताना येणाऱ्या अडचणींबाबतही तिने सांगितलं. ती म्हणाली की, तुमचं तुमच्या जोडीदारासोबत नातं चांगलं असलं पाहिजे. तुम्ही इव्हेंट्सला किंवा सुट्टीवर जाऊ शकत नाही. पण हे सगळं यावर अवलंबून असतं की, स्थिती कशी आहे. जर परिवारात लहान मुले असतील तर विषय वेगळा असतो. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेairplaneविमान