शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रिअल लाइफ जुदाई! विवाहित व्यक्तीच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी पत्नीला दिले १.४ कोटी रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 13:38 IST

चीनमधील एक महिला ऑफिसमध्ये सोबत काम करणाऱ्या एका विवाहित व्यक्तीच्या प्रेमात पडली. त्याला मिळवण्यासाठी ती १.४ कोटी रूपये देण्यास तयार होती.

१९९७ साली दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी, उर्मिला मांतोडकर आणि अनिल कपूरचा 'जुदाई' सिनेमा आला होता. ज्यात उर्मिला ही विवाहित अनिल कपूरच्या प्रेमात पडते. अशात त्याला मिळवण्यासाठी ती श्रीदेवीला वेगवेगळी आमिषं आणि पैसे देते. धक्कादायक बाब म्हणजे अशीच एक खरीखुरी घटना समोर आली आहे.

चीनमधील ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. फक्त त्यात एक छोटा ट्विस्ट आहे. 'साऊथ चायना मॉर्निंग' पोस्टनुसार, चीनमधील एक महिला ऑफिसमध्ये सोबत काम करणाऱ्या एका विवाहित व्यक्तीच्या प्रेमात पडली. त्याला मिळवण्यासाठी ती १.४ कोटी रूपये देण्यास तयार होती. पण पुढे जे घडतं ते चांगलंच इंटरेस्टींग आहे.

व्यक्तीच्या पत्नीला दिले १.४ कोटी रूपये

SCMP च्या रिपोर्टनुसार, शी नावाची महिला तिच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या हान नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडते. त्याला मिळवण्यासाठी ती त्याला पत्नीला घटस्फोट देण्यास सांगते. या बदल्यात महिला त्याच्या पत्नीला २.४ मिलियन युआन म्हणजे भारतीय करन्सीनुसार, २ कोटी ८० लाख रूपये देण्यास तयार असते. त्यानंतर २०२२ मध्ये महिलेने हानच्या पत्नीच्या अकाऊंटमध्ये १.२ मिलियन युआन म्हणजे १.४ कोटी रूपये टाकले.

यानंतर व्यक्तीची पत्नी महिलेला वर्षभर ताटकळत ठेवते आणि आपल्या पत्नीला घटस्फोटही देत नाही. जेव्हा शी प्रियकराच्या पत्नीकडे पैसे परत मागते तेव्हा ती पैसे परत देण्यास नकार देते. त्यानंतर शी तिच्याविरोधात कोर्टात केस दाखल करते.

कोर्टात शी सांगते की, तिने व्यक्तीची पत्नी यांगसोबत घटस्फोटासाठी ‘वर्बल एग्रीमेंट’ केलं होतं. म्हणजे दोघींमध्ये याबाबत बोलणं झालं होतं. अशात शी म्हणाली की, यांगने एग्रीमेंट तोडल्याने तिने पैसे व्याजासह परत करावे. पण कोर्टाने तिचे दावे फेटाळले. दरम्यान, शी आणि यांगमध्ये आता घटस्फोट झाला आहे. ते ३० दिवसांच्या 'कूलिंग पिरिअड'वर आहेत. ज्यात त्यांना त्यांचं नातं सुधारण्यासाठी आणखी एक संधी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेchinaचीनDivorceघटस्फोट