(Image Credit : Yahoo News)
आजकाल आपला बिझनेस चालवण्यासाठी मालक वेगवेगळ्या आयडिला लावतात. जेणेकरून या स्पर्धेच्या दुनियेत ते मागे राहू नये. मग ते फॅशनचं विश्व असो वा हॉटेलचं. ग्राहकांना आपल्या व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी उद्योगपती वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतात. पण चीनच्या एका हॉटेल मालकाने जरा दोन पावलं पुढची आयडिया लावली. येथील एका हॉटेलमध्ये जेवण वाढण्याची एक वेगळीच पद्धत तयार केली आहे.
तुम्ही ऐकलं असेल की, काही रेस्टॉरंटमध्ये लोकांना रोबोट द्वारे जेवण वाढलं जातं तर कुठे टॉयलेटच्या सीटवर बसवून लोकांना जेवण दिलं जातं. पण चीनमधील रेस्टॉरंटमधील पद्धत तुम्हाला त्या रेस्टॉरंटकडे तुम्हाला घेऊन जाईल.
चीनच्या श्यांग शहरात Daoxianj रेस्टॉरंट आहे. इथे लोकांना आकर्षित करण्यासाठी एक आयडियाची कल्पना लावली गेली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी यावं म्हणून या हॉटेलमध्ये बिकीनी वेटर्स ठेवण्यात आल्या आहेत. या फीमेल वेटर्स बिकीन घालून जेवण वाढतात.
सुंदर दिसणाऱ्या या वेट्रेस केवळ बिकीनीमध्ये येतात. त्यांच्या शरीरावर रेस्टॉरंटचं नाव देखील गोंदलेलं बघायला मिळतं. या बिकीनी वेट्रेस ठेवल्यानंतर इथे ग्राहकांची संख्या फार जास्त वाढली. दरम्यान आता बिकीनी वेट्रेस समोर आहे म्हटल्यावर लोकांचं खाण्यात कमी आणि त्यांच्याकडेच अधिक लक्ष राहतं.
काही लोक तर या सुंदर वेट्रेसेसचे फोटो देखील काढतात. काही लोकांना यात काही आक्षेपार्ह वाटत नाही. पण काही लोकांनी यावर आक्षेप घेतलाय. ते म्हणतात की, याने ग्राहकांवर वाईट प्रभाव पडेल.