शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

कँडी खा आणि वार्षाला 61 लाख रुपये कमवा! 'या' कंपनीला हवाय CHIEF CANDY OFFICER

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 11:15 IST

Chief Candy Officer: ही कॅनेडियन कंपनी चीफ कँडी ऑफिसर नियुक्त करण्याचा विचार करत आहे. यासाठी कंपनी 100,000 कॅनेडियन डॉलर (61.14 लाख रुपये) पगार देणार आहे.

आपण नेहमीच बघतो, की लहान मुलांना कँडी खायला प्रचंड आवडते. एवढेच नाही, तर अनेक वेळा मोठे झाल्यानंतरही लोकांची कँडी खाण्याची सवय गेलेली नसते. जर, कँडी खाण्यासाठी लाखो रुपये मिळतील, असे आपल्याला कुणी सांगितले तर काय कराल? एवढी सुंदर नोकरी नाकारणारा क्वचितच कुणी असेल. कँडी तयार करणाऱ्या एका कंपनीने असाच एक जबरदस्त जॉब ऑफर केला आहे. कँडी लव्हर्स कँडी फनहाऊसने ऑफर केलेल्या या जॉबची संधी क्वचितच सोडतील. ही कंपनी चॉकलेट बारपासून ते लिकोराइसपर्यंत कन्फेक्शनरीची एक ऑनलाईन रिटेलर विक्रेता आहे.

टेस्टसाठी दर महिन्याला मिळणार लाखो रुपये -ही कॅनेडियन कंपनी चीफ कँडी ऑफिसर नियुक्त करण्याचा विचार करत आहे. यासाठी कंपनी 100,000 कॅनेडियन डॉलर (61.14 लाख रुपये) पगार देणार आहे. एवढेच नाही, तर हे काम आपल्याला आपल्या घरी बसल्याबसल्या करायचे आहे. म्हणजेच कंपनी आपल्याला वर्क फ्रॉम होमची सुविधाही देत आहे. अर्थात, घरबसल्याच आपल्याला कँडी टेस्ट करायची आहे आणि या बदल्यात आपल्याला लाखो रुपये मिळणार आहेत. जुलै महिन्यात लिंक्डइनवर पोस्ट करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे, की ड्यूटीमध्ये  मुख्य कँडी बोर्डाची बैठक, मुख्य स्वाद परीक्षक आणि अशाच काही कामांचा समावेश आहे. याशिवाय, आई-वडिलांच्या परवानगीसह पाच वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवारांसाठीही ही जागा रिक्त आहे. 

एका दिवसात टेस्ट कराव्या लागतील एवढ्या कँडी -यासंदर्भात बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी जमील हेजाजी म्हणाले, की त्याच्याकडे काही अनपेक्षित अर्जही आले आहेत. यात वेतन आणि कामे शेअर करणाऱ्या अनेक इच्छुक कुटुंबांचे  व्हिडिओही आले आहेत. माध्यमांशी बोलताना जमील म्हणाले, सोशल मीडियाने दावा केला आहे, की एका मुख्य कँडी अधिकाऱ्याला दर महिन्याला कँडीचे 3,500 तुकडे खावे लागणार आहेत. हे चूक आहे. एका दिवसात केवळ 117 तुकडेच टेस्ट करावे लागणार आहेत. हे खूप सारे आहेत.

सोशल मीडियावरही होतेय चर्चा - नोकरीच्या या ऑफरमुळे सोशल मीडियावरही जबरदस्त चर्चा सुरू आहे. वृद्धांबरोबरच, मुलांनीही या पोस्टसाठी अर्ज केला आहे. अनेक पालकांनी आपल्या मुलांचे अर्ज करतानाचे व्हिडिओ तयार केले आहेत आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावरही पोस्ट केले आहेत. इंस्टाग्रामवर टोरंटो येथील या कंपनीचे जवळपास 340, 000 आणि टिकटॉकवर तीन मिलियन फॉलोअर्स आहेत, यात एका कार्दशियनचाही समावेश आहे.

टॅग्स :jobनोकरीCanadaकॅनडाEmployeeकर्मचारी