काय सांगता? चक्क एका मांजरीला बनवलं 'या' शहराची महापौर; कारण ऐकून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 14:29 IST2022-04-28T14:28:15+5:302022-04-28T14:29:51+5:30
एका मांजराला एका शहराचं महापौर बनवण्यात आलं आहे. महापौर बनलेली ही मांजर सध्या चर्चेत आली आहे.

फोटो - news18 hindi
महापौर हा शहराचा प्रमुख असतो. त्यामुळे त्याची भुमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. मोठ्या शहराचा कारभार त्याच्या हातात असतो. अशा या महत्त्वाच्या महापौरपदाच्या खुर्चीवर तुम्हाला जर कोणी मांजर असल्याचं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. एका मांजराला एका शहराचं महापौर बनवण्यात आलं आहे. महापौर बनलेली ही मांजर सध्या चर्चेत आली आहे.
अमेरिकच्या मिशिगन शहरात मांजराला महापौर करण्यात आलं आहे. जिंक्स असं या मांजरीचं नाव आहे. 24 एप्रिलला तिला महापौरपद देण्यात आलं. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मांजरीला महापौर बनवण्यात आलं असावं. याआधी मोठ्या डोळ्यांमुळे ही मांजर चर्चेत आली होती पण आता महापौर बनल्याने पुन्हा चर्चा रंगली आहे. जिंक्सची मालकीण मियाने सांगितलं की, जिंक्स महापौरपदासाठी सर्वात योग्य होती. टिकटॉकवर तिचे जवळपास 7 लाख 35 हजार तर इन्स्टाग्रामवर 4 लाख फॉलोअर्स आहेत.
मियाला तीन वर्षांपूर्वी जिंक्स तिच्या घराबाहेर भेटली. मियाने सांगितलं जेव्हा जिंक्सला ती भेटली तेव्हा ती फक्त तीन आठवड्यांची होती. त्यानंतर ती तिला घेऊन कॅलिफॉर्नियाला आली. तिथे जिंक्सचे डोळे आणि तिचे पाय थोडे वेगळं असल्याचं दिसलं. इतर मांजरांपेक्षा ते खूपच मोठे होते. मियाने तिला डॉक्टरांनीही दाखवलं. डॉक्टरांनी तिला कोणताही आजार नसून हा जन्मदोष असल्याचं सांगितलं.
मियाने जिंक्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. जे खूप व्हायरल झाले. काही कालावधीपूर्वीच तिने मजेत एक ट्विटर पोस्ट केली होती. ज्यात तिने आपण अनेक प्राण्यांना महापौर बनताना पाहिलं आहे, आपल्या मांजराला राष्ट्रपती बनवणार असल्याचं म्हटलं. हे ट्विटरकुणीतरी मिशगनलाही टॅग केलं आणि पाहता पाहता जिंक्सची महापौरपदासाठी निवड झाली. तिला एका दिवसासाठी महापौर बनवण्यात आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.