Can Gold Make In Lab : सगळ्यांना हव्या असलेल्या आणि चमकदार सोन्याचे भाव रोज गगनाला भिडत आहेत. लग्न असो, एखादा खास सण असो वा गुंतवणूक असो सोनं हा सगळ्यात विश्वासू धातू मानला जातो. अशात विज्ञानाच्या मदतीने आता लॅबमध्ये कधी कल्पनाही केली नसेल अशा गोष्टी बनवल्या जात आहे, तर मग अनेकांना प्रश्न पडतो की, सोनंही लॅबमध्ये बनवलं जाऊ शकतं का? तसा हा प्रश्न काही नवीन नाही. शेकडो वर्षाआधीही शीसे आणि पारा मिक्स करून सोनं बनवण्याचं स्वप्न काहींनी पाहिलं होतं. त्या काळात ही बाब चमत्कार किंवा रहस्य मानली जात होती. पण आज जर विज्ञान अणुलाही तोडू शकत असेल तर मग सोन्याबाबतचा हा प्रश्न पुन्हा उभा राहणं साहजिक आहे. अशात सोनं खरंच लॅबमध्ये बनवलं जाऊ शकतं का आणि बनवता आलंच तर त्यासाठी किती खर्च येईल? हे आज आपण समजून घेणार आहोत.
सोनं नेमकं काय असतं?
सोनं हे कोणतंही मिश्रण नाही, ते एक शुद्धा रायायनिक तत्व आहे. सोन्याचं रासायनिक नाव Gold (Au) आणि अणु क्रमांक ७९ आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक सोन्याच्या अणूच्या केंद्रकात नेमके ७९ प्रोटॉन असतात. जगात कुठेही असलेला प्रत्येक सोन्याचा अणू तो भारतात असो किंवा अमेरिकेत रासायनिकदृष्ट्या पूर्णपणे सारखाच असतो. म्हणूनच सोनं लॅबमध्ये तयार करणं इतकं कठीण आहे. कारण कोणतीही वस्तू सोनं बनवायची असेल, तर तिच्या अणूमध्ये ७९ प्रोटॉन असलेला अणू तयार करावा लागतो. एखाद्या घटकाच्या अणूमधील प्रोटॉनची संख्या जर ७९ झाली, तर तो घटक सोनं बनतो.
लॅबमध्ये सोनं बनवता येतं का?
सोनं कोणत्याही रासायनिक प्रक्रियेतून तयार होत नाही. यासाठी एक खास प्रक्रिया वापरली जाते. ज्याला न्यूक्लिअर ट्रान्सम्यूटेन असं म्हणतात. या प्रक्रियेत एखाद्या जड तत्वाचे जसे की, पारा किंवा शीसे यांच्या अणूंवर न्यूट्रॉन सोडले जातात. यामुळे अणु अस्थिर होतात. मग ते रेडिओअॅक्टिव प्रक्रियेतून जातात. नंतर ते एका दुसऱ्याच तत्वात बदलतात. यादरम्यानच काही अणु सोन्यात रूपांतरित होतात. ही प्रक्रिया सुपरनोवा स्फोटांमध्ये होते, न्यूट्रॉन स्टार्सची भिडत होते आणि असं मानलं जातं की, ब्रम्हांडात सोनं असंच तयार होतं.
किती खर्च येईल?
सोनं तयार करण्यासाठी न्यूक्लियर ट्रान्सम्युटेशन ही प्रक्रिया करावी लागते. फक्त १ ग्रॅम सोनं तयार करण्यासाठी इतकी प्रचंड ऊर्जा लागते की त्यातून एक संपूर्ण शहर काही तास वीजेवर चालू शकतं. यासाठी परमाणु रिऍक्टर, पार्टिकल अॅक्सेलरेटर, अब्जावधी न्यूट्रॉन्स आणि अत्यंत कडक सुरक्षेची गरज असते. त्यामुळे जेवढं सोनं तयार होईल, त्याच्या किमतीपेक्षा त्यावर होणारा खर्च लाखो पटीने जास्त असतो.
याशिवाय प्रयोगशाळेत तयार झालेलं सोनं अनेकदा रेडिओॲक्टिव असू शकतं, जे दागिने किंवा गुंतवणुकीसाठी योग्य नसतं. म्हणूनच बाजारातून सोनं खरेदी करणं हे स्वस्त, सोपं आणि सुरक्षित आहे, तर प्रयोगशाळेत सोनं बनवणं हे अतिशय महागडं आणि अव्यवहार्य ठरतं. प्रत्यक्षात ही प्रक्रिया कधीही नफ्यासाठी वापरता येत नाही.
Web Summary : Creating gold in a lab is theoretically possible via nuclear transmutation, but incredibly expensive. The energy required far exceeds the gold's value, rendering it impractical and potentially radioactive. Buying gold remains cheaper and safer.
Web Summary : परमाणु परिवर्तन से लैब में सोना बनाना सैद्धांतिक रूप से संभव है, लेकिन बेहद महंगा है। आवश्यक ऊर्जा सोने के मूल्य से कहीं अधिक है, जिससे यह अव्यावहारिक और संभावित रूप से रेडियोधर्मी हो जाता है। सोना खरीदना सस्ता और सुरक्षित है।