शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

एका महिलेला छम्मक छल्लो बोलला नी तुरुंगात गेला, ठाण्यातली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 13:49 IST

महिलेला गलिच्छ शब्दाने हाक मारल्याबद्दल एका व्यक्तिला ठाणे कोर्टातील न्यायाधीशांनी 1 रुपया दंड आणि कोर्ट संपेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. आठ वर्षांपूर्वी घोडबंदर येथे राहणाऱ्या या व्यक्तिला ही शिक्षा इंडियन पीनल कोडच्या 509 अंतर्गत करण्यात आली.

ठळक मुद्देमहिलेचा पाय आरोपी व्यक्तिच्या केराच्या बादलीला लागला व बादली उलटी झालीया महिलेने व तिच्या पतीने ही बादली मुद्दामहून पाडल्याचा आरोप करत त्याने तिला छम्मक छल्लो म्हटले

ठाणे, दि. 4 - महिलेला गलिच्छ शब्दाने हाक मारल्याबद्दल एका व्यक्तिला ठाणे कोर्टातील न्यायाधीशांनी 1 रुपया दंड आणि कोर्ट संपेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. आठ वर्षांपूर्वी घोडबंदर येथे राहणाऱ्या या व्यक्तिला ही शिक्षा इंडियन पीनल कोडच्या 509 अंतर्गत करण्यात आली. महिलेचा अवमान करणारे शब्द अथवा हावभाव केल्यास या कलमांतर्गत गुन्हा दाखल होतो.सदर व्यक्ति एका इमारतीतील चौथ्या मजल्यावर राहते. तर पाचव्या मजल्यावर तक्रारदार महिला राहते. 9 जानेवारी 2009 रोजी ही महिला व तिचा पती सकाळी सव्वा नऊ वाजता फेरफटका मारून परतत होते. आपल्या फ्लॅटमध्ये जाताना या महिलेचा पाय आरोपी व्यक्तिच्या केराच्या बादलीला लागला व बादली उलटी झाली. यामुळे आरोपी पुरुषाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. या महिलेने व तिच्या पतीने ही बादली मुद्दामहून पाडल्याचा आरोप करत त्याने तिला छम्मक छल्लो म्हटले. हे शब्द महिलेचे पावित्र्य भंग कराणारे असून या शब्दांमुळे माझा अपमान झाल्याचा आरोप या महिलेने केला.तिने सदर व्यक्तिविरोधत सोसायटीकडे तक्रार केली परंतु तिची दखल घेण्यात आली नाही. अखेर या महिलेने कायद्याची मदत घेतली. सदर पुरुषाने न्यायालयात युक्तिवाद केला की या महिलेने जाणुनबुजून आपल्याला त्रास दिला व केराची बादली मुद्दाम पाडली. परंतु न्यायाधीशांनी त्याची बाजू अयोग्य ठरवली.छम्मक छल्लो हे हिंदी शब्द आहेत. इंग्रजीत त्यांना काही अर्थ नाही असे सांगतानाच न्यायाधीशांनी भारतीय संदर्भात या शब्दांचा अर्थ लावला पाहिजे असे सांगत हे शब्द महिलेचा अपमान करणारे असल्याचा निष्कर्ष काढला. हे शब्द महिलेचा सन्मान करण्यासाठी नाही तर तिला हीन लेखण्यासाठी वापरले जातात असेही त्यांनी सांगितले. हे शब्द ऐकल्यावर कुठल्याही महिलेला मानसिक त्रासच होतो, त्यामुळे कलम 509 अंतर्गत महिलेचा अवमान झाल्याचे सिद्ध होत असल्याचा निष्कर्ष न्यायाधीश आर. टी. इंगळे यांनी काढला.अखेर, न्यायाधीशांनी छम्मक छल्लो हे शब्द वापरत महिलेची बदनामी करणाऱ्या या पुरुषाला एक रुपया दंड व कोर्ट संपेपर्यंतचा दिवस तुरुंगात घालवण्याची शिक्षा दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसCourtन्यायालय