ना गाडी ना दागिने चोरांनी २० लाखांची अजब वस्तू केली लंपास, काय ते वाचून व्हाल अवाक् 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 04:47 PM2019-08-07T16:47:55+5:302019-08-07T16:54:35+5:30

यावेळी चोरांनी कोट्यवधी रूपयांचे दागिने नाही तर २० लाख रूपयांच्या अशा वस्तू चोरी केल्या ज्यांचा लोकांना फारच महत्त्वाचा फायदा होतो.

Burglars steal shapewear undergarment worth 2 million | ना गाडी ना दागिने चोरांनी २० लाखांची अजब वस्तू केली लंपास, काय ते वाचून व्हाल अवाक् 

ना गाडी ना दागिने चोरांनी २० लाखांची अजब वस्तू केली लंपास, काय ते वाचून व्हाल अवाक् 

Next

चोर किती हुशार असतात याचे वेगवेगळे किस्से तुम्ही अनेकदा ऐकले असतीलच. पण यावेळी ज्या चोरांबाबत तुम्हाला सांगणार आहोत, त्यांचा कारनामा वाचून तुमचं हसू आवरणार नाही. कारण यावेळी चोरांनी कोट्यवधी रूपयांचे दागिने नाही तर २० लाख रूपयांच्या अशा वस्तू चोरी केल्या ज्यांचा लोकांना फारच महत्त्वाचा फायदा होतो.

चोरांनी पूर्ण तयारीनिशी कॉंक्रिटच्या छताला छिद्र पाडून ते गोडाऊनमध्ये शिरले. त्यांना गोडाऊनमधील अलार्मही बंद केला होता. त्यांनी गोडाऊनमधील २० लाख रूपयांचा माल लंपास केला. चोरांनी चोरी केलेल्या वस्तू भलेही गाडी किंवा दागिन्यांच्या बरोबरी नसल्या तरी ब्लॅक मार्केटमध्ये या वस्तूला फार डिमांड आहे.

ही वस्तू दुसरं तिसरं काही नसून हाय एंड फाजा(शेपविअर) आहे. चोरांनी ३४ हजार फाजाच्या जोडी चोरी केल्या. ही एक अशी अंडरगारमेंट आहे, जे मियामीच्या हिस्पॅनिक समुदायात फार लोकप्रिय आहे.

ही चोरी गेल्यावर्षी करण्यात आली होती. पण यावर्षी ही चोरी सार्वजनिक करण्यात आली. रिपोर्टनुसार, एक चतुर्थांश पेक्षा कमी फाजा प्रीमिअर इंटरनॅशनल ग्रुपला परत करण्यात आला आहे.

मियामी-डॅडच्या कार्गो थेफ्ट यूनिटच्या गुप्तहेरांनी पाहिले की, 'ब्लॅक मार्केट' च्या विक्रेत्यांनी फाजोच्या पिशव्या कचऱ्यात टाकल्या होत्या. या पिशव्यांच्या मदतीने चोरीची माहिती मिळाली. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे अंदाजे २० लाख रूपयांच्या मालाची चोरी करणाऱ्या चोरांचा अजूनही पत्ता लागला नाही.

Web Title: Burglars steal shapewear undergarment worth 2 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.