Britain's longest coronavirus sufferer leaves hospital | क्या बात! मरण दोनदा आलं होतं जवळ, तब्बल 95 दिवसांनी कोरोनाला मात देत घरी परतला रूग्ण....

क्या बात! मरण दोनदा आलं होतं जवळ, तब्बल 95 दिवसांनी कोरोनाला मात देत घरी परतला रूग्ण....

हॉस्पिटलकडून एका कोरोना रूग्णाच्या परिवाराला दोनदा कळवण्यात आले की, त्यांचा मृत्यु होणार आहे. मात्र, तब्बल 95 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर तो कोरोना रूग्ण बरा होऊ आता घरी परतला आहे. ही घटना आहे ब्रिटनची.

तीन महिन्यांपेक्षा अधिकचा काळ हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर तीन मुलांचा वडील असलेला कीथ वॉटसन हा 25 जूनला घर परतला. इतका मोठा काळ त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे त्यांचं वजन फारच घटलं आहे. डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार, कीथ ब्रिटनमध्ये कोरोनाने सर्वाधिक(95 दिवस) आजारी राहणारा व्यक्ती झालेत. याआधी ब्रिटनमध्ये स्टीव व्हाइट 92 दिवसांच्या उपचारानंतर बरे झाले होते.

52 वर्षाचे कीथ वॉटसन कोमात गेले होते. त्यामुळे त्यांना एक महिन्यापेक्षा अधिक काळ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. साधारण 41 दिवस त्यांनी आयसीयूमध्ये काढलेत. जेव्हा त्यांची किडनी आणि फुप्फुसांनी काम करणं बंद केलं तेव्हा त्यांच्या परिवाराला वाईट बातमी देण्यात आली की, त्यांच्याकडे आता जास्त वेळ राहिलेला नाही.

कीथ वॉटसन म्हणाले की, मला विश्वास बसत नाहीये की, मी जिवंत आहे. मी त्या लोकांबाबत विचार करतो जे असं करू शकले नाहीत. वॉटसन हे अस्थमाने पीडित होते. ते 20 मार्च रोजी त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये गेले होते. 

दरम्यान ब्रिटनमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेल्या दोन तृतीयांश कोरोना रूग्णांचा मृत्यु झाला होता. ज्यावेळी कीथ यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते, त्यावेळी ब्रिटनमध्ये कोरोनाने केवळ 144 मृत्यु झाले होते. पण आता ब्रिटनमध्ये कोरोनाने मृतांची संख्या 43000 इतकी झाली आहे.

...अन् डॉक्टर आमदाराने अनेक किमी पायपीट करुन सीमेवरील सुरक्षा जवानाचे प्राण वाचवले!

कोरोनामुळे शिक्षकाची नोकरी गेली; पण पत्नीसोबत रस्त्यावर डोसा विकण्यासाठी बनला आत्मनिर्भर!

Web Title: Britain's longest coronavirus sufferer leaves hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.