शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
4
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
5
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
6
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
7
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
8
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
9
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
10
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
11
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
12
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
13
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
14
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
15
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
16
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
17
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
19
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
20
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...

नवरदेव चक्कर येऊन पडला अन् त्याचा विग मेहुण्याच्या हातात आला, नवरीने लग्नास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 16:21 IST

UP : नवरदेवाची पोलखोल होताच उपस्थित सगळेच हसू लागले होते आणि नवरीकडील लोकांनी फसणवूक केल्याचं सांगत नवरदेवाला बंदी बनवलं.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) उन्नाव जिल्ह्यातील सफीपूर भागातील परियर गावातील राहणारा लखन कश्यपच्या मुलीचं लग्न कल्याणपूर कानपूर नगरमधील एका तरूणासोबत ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे नवरदेवाची वरात आली होती. रितीरिवाज झाल्यावर सप्तपदीवेळी नवरदेवाला चक्कर येऊन तो पडला. नवरीच्या भावाने नवरदेवाच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर पाणी शिंपडलं. त्यानंतर त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तर त्याच्या हातात नवरदेवाचा विग आला. हे बघता उपस्थित सगळेच हसू लागले होते आणि नवरीकडील लोकांनी फसणवूक केल्याचं सांगत नवरदेवाला बंदी बनवलं. त्यानंतर नवरीने लग्न करण्यास नकार दिला. यादरम्यान दोन्हीकडील लोकांमध्ये मारहाण होण्याची वेळ आली होती.

झालं असं की, निशाचं लग्न विकास कॉलनी कानपूरच्या पंकज कश्यपसोबत ठरलं होतं. २० मे च्या सायंकाळी नाचत-वाजत नवरदेवाची वरात नवरीच्या दारात पोहोचली. नवरीकडील लोकांनी वरातीचं जोरदार स्वागत केलं. पाहुण्यांनी डीजेवर डान्स भरपूर आनंद घेतला. जेवण झाल्यावर हार घालण्याचा रिवाज पार पडला. त्यानंतर सप्तपदीसाठी नवरदेव मंडपात पोहोचला. तयारी पूर्ण झाली होती. 

यादरम्यान नवरदेवाला चक्कर आली आणि तो बेशुद्ध पडला. यामुळे दोन्हीकडील लोकांमध्ये गोंधळ उडाला. नवरीच्या भावाने नवरदेवाच्या डोक्यावर हात फिरवायला सुरूवात केली. तेव्हा अचानक नवरदेवाचा विग त्याच्या हातात आला. टकला नवरदेवाची पोलखोल झाल्यावर नवरीकडील लोक हैराण झाले. 

तरी सुद्धा घरातील वयोवृद्ध मंडळींनी वाद शांत केला. मग नवरीकडील लोकांनी नवरदेवावर फसवणुकीचा आरोप लावला. या घटनेची सूचना पोलिसांना देण्यात आली. ज्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितलं की, नवरदेवाचा विग हाती आल्याने नवरीकडील लोक लग्नासाठी तयार नव्हते. पोलिसांसमोरच दोन्हीकडील लोक वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न