शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वरातीत आलेल्या पाहुण्यांनी केलं असं काही, मंडप सोडून पळाली नवरी; म्हणाली - मी त्याच्याशी लग्न कसं करू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 13:29 IST

उत्तर  प्रदेशच्या मेरठमध्ये लग्नात नवरदेवासोबत आलेल्या वरातीने असं काही केलं की, नवरीने ऐनवेळी लग्न करण्यात नकार दिला. इतकंच नाही तर याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल केली.

भारतीय लग्ने फारच रोमांचक असतात. लग्नात रितीरिवाज, तामझाम, गोंधळ, भांडणं, जल्लोषात चालवल्या जाणाऱ्या गोळ्या इत्यादी कारणांमुळे लग्ने चर्चेत राहतात. उत्तर प्रदेशातील अशाच एका लग्नाची सध्या चर्चा सुरू आहे. उत्तर  प्रदेशच्या मेरठमध्ये लग्नात नवरदेवासोबत आलेल्या वरातीने असं काही केलं की, नवरीने ऐनवेळी लग्न करण्यात नकार दिला. इतकंच नाही तर याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल केली.

आयएनएनच्या एका रिपोर्टनुसार, मेरठमध्ये सुरू असलेल्या या लग्नात नवरदेवाकडील काही पाहुण्यांनी लग्नादरम्यान बंदुकीची फायरिंग केली. यात २२ वर्षीय नवरीचे काका जखमी झाले. यामुळे नवरीने नवरदेव शहजादसोबत लग्नास नकार दिला. (हे पण वाचा : एका जाहिरातीमुळे बदललं महिलेचं आयुष्य, समोर आलं पतीचं धक्कादायक सत्य)

नवरी इरम म्हणाली की, 'मी त्याच्यासोबत लग्न कशी करू शकते? जर त्यांचा परिवार माझ्या संपूर्ण परिवारासमोर अशाप्रकारे व्यवहार करत आहे, तर मी जेव्हा एकटी त्यांच्या घरी राहणार तेव्हा ते माझ्यासोबत कसा व्यवहार करतील?'.

मुलीने जसा आपला निर्णय ऐकवला. तिच्या नातेवाईकांनी नवरदेवाची कार तोडली. सोबतच नवरदेवाच्या नातेवाईकांची धुलाई सुद्धा केली. तसेच त्यांना काही वेळासाठी बंदीही बनवून ठेवलं. नंतर पोलिसांनी येऊन स्थिती कंट्रोलमध्ये ठेवली. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नवरीच्या काकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

सीनिअर सब-इन्स्पेक्टर रवींद्र पलात यांनी सांगितलं की, 'लग्नातील व्हिडीओ फुटेजच्या माध्यमातून फायरिंग करणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे.  नवरदेव शहजाद, त्याचा भाऊ पप्पू आणि शानू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर फायरिंग लायसेन्स हत्यारांनी करण्यात आली असेल तर लायसन्स रद्द करण्याची नोटीस पाठवली जाईल'. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नJara hatkeजरा हटके