शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

बहिणीच्या लग्नात केली अत्यंत लाजिरवाणा प्रँक, लग्न मोडणारच होतं इतक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 18:11 IST

यानंतर आता वधूच्या या बहिणीनेच सोशल मीडियावर (Social Media) आपली व्यथा सांगितली, त्यानंतर काही लोक तिची मस्करी करत आहेत तर काहीजण तिच्या बहिणीचं कृत्य चुकीचं असल्याचं म्हणत आहेत.

तुमच्या लग्नाच्या दिवशीच (Wedding Day) कोणी तुमच्या प्रेमावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर काय होईल? कोणीतरी या चांगल्या दिवसाची पूर्णपणे वाट लावली, असंच कोणाच्याही मनात येईल. असंच काहीसं एका वधूसोबत घडलं, जिच्या बहिणीने तिच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस खराब केला. यानंतर आता वधूच्या या बहिणीनेच सोशल मीडियावर (Social Media) आपली व्यथा सांगितली, त्यानंतर काही लोक तिची मस्करी करत आहेत तर काहीजण तिच्या बहिणीचं कृत्य चुकीचं असल्याचं म्हणत आहेत.

वधूच्या बहिणीने तिच्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशी एक विनोदी खेळ खेळण्याचा निर्णय घेतला, परंतु याचा परिणाम पूर्णपणे उलट झाला. नवरीच्या बहिणीने Reddit वर एक किस्सा सांगितला. यात तिने म्हटलं की 'माझ्या बहिणीचा जवळपास 2 वर्षांपूर्वी साखरपुडा झाल होता'. तिने Reddit च्या Am I The Asshole वर याबाबत लिहिलं आहे. तिने या घटनेबाबत लोकांकडे समर्थन मागितलं आणि म्हटलं की मी फक्त मस्करी करत होते..

द सनच्या रिपोर्टनुसार, नवरीच्या बहिणीने सांगितलं की मला तिचा राग येत नाही. वयातील अंतरामुळे आम्ही कधीच बहिणींप्रमाणे एकमेकींच्या खूप जवळ नव्हतो, पण आम्ही एकमेकींचा रागरागही करत नव्हतो. तिचा पती एक महान व्यक्ती आहे. मी खरंतर त्या दोघांसाठी खूप खूश आहे. ती म्हणाली, लग्नानंतर कार्यक्रम समाप्त होताना पादरींनी विचारलं की या लग्नाविषायी कोणाला काही आपत्ती आहे का? आणि मी उभा राहून म्हटलं की 'हो मला तक्रार आहे...कारण हे कपल एकमेकांवर खूप प्रेम करतं.'

नवरीच्या बहिणीने सांगितलं की मी हे फक्त मस्करी म्हणून बोलले. मला असं वाटलं की हे ऐकून रिसेप्शनमधील सर्व लोक हसू लागतील. मात्र मी उभा राहताच माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला. पुढे तिने लिहिलं, 'माझी बहीण कदाचित माझ्यावर अजूनही नाराज आहे. कार्यक्रमात तेवढं बोलून मी खाली बसले आणि कार्यक्रम पुढे सुरू राहिला. रिसेप्शनमध्ये मी माझ्या बहिणीच्या जवळ गेले, मात्र ती खूप नाराज होती. तिने मला म्हटलं की तुझी मस्करी ही खरंतर मस्करी नव्हती. तू माझा मूड, माझा आनंद आणि माझा दिवस पूर्णपणे खराब केलास. हे ऐकून मला धक्का बसला'

महिलेला या पोस्टनंतर लोक आपल्याला समर्थन देतील अशी अपेक्षा होती. मात्र अनेकांनी तिलाच सुनावलं आहे. एका यूजरने लिहिलं, 'तिच्या इतक्या खास दिवशी, अशा पद्धतीने सीन क्रिएट करणं चुकीचं होतं.' दुसऱ्या यूजरने लिहिलं, 'कदाचित तू आणि तुझ्या बहिणी अशा मस्करीचं बॉन्डिंग नसेल.' आणखी एकाने लिहिलं, 'काही लोक तर अशा गोष्टीनंतर लग्नाचा कार्यक्रमही मध्येच थांबवतात. तू खरंच संपूर्ण लग्न खराब केलं होतं.'

टॅग्स :Jara hatkeजरा हटके