लग्नाच्या दिवशीच नवरीने नवरदेवाला दुसऱ्या महिलेसोबत पकडलं, अर्ध्या कपड्यांमध्ये गेला पळून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 15:20 IST2023-03-09T15:20:19+5:302023-03-09T15:20:36+5:30
Bride Groom Shocking Video: लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने दगा दिल्याने ती पार ढासळली होती. तिच्या नातेवाईक आणि मित्रांनी तिला आधार दिला, पण ती ऐकत नव्हती.

लग्नाच्या दिवशीच नवरीने नवरदेवाला दुसऱ्या महिलेसोबत पकडलं, अर्ध्या कपड्यांमध्ये गेला पळून...
Bride Groom Shocking Video: सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल झालाय जो बघून तुम्ही हैराण व्हाल. एका नवरीने आपल्या लग्नाच्या दिवशीच नवरदेवाला एका दुसऱ्या महिलेसोबत पाहिलं आणि त्याने दगा दिल्यानंतर ती रडू लागली. हा व्हिडीओ आधी टिकटॉकवर व्हायरल झाला होता. त्यानंतर वेगवेगळ्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने दगा दिल्याने ती पार ढासळली होती. तिच्या नातेवाईक आणि मित्रांनी तिला आधार दिला, पण ती ऐकत नव्हती.
हा व्हिडीओ कथितपणे चीनचा आहे आणि याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या सुरूवातीला एक नवरी कारच्या दिशेने धावत जाताना दिसत आहे, जिथे ती नवरदेवाला दुसऱ्या महिलेसोबत बघते. नवरीला बघून तो त्या महिलेला लपवतो. नंतर तो तिथून पळून जातो तर नवरी तिथेच रडत उभी असते. ती त्याचा पाठलाग करते, पण तो पळून जातो. व्हिडिओत बघू शकता की, तो अर्ध्या कपड्यांमध्ये धावत आहे.
हे बघून नवरी ढसाढसा रडू लागते. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील लोक हैराण झाले आहेत. लोक यावर भरभरून कमेंट्स करत आहेत. या व्हिडिओला 50 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. सोशल मीडिया यूजरने तिच्याबाबत सहानुभूती व्यक्त केली आहे.