लग्नाच्या दिवशीच पतीनं 'असं' काही केले; भडकलेल्या पत्नीनं मागितला थेट घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 06:41 PM2022-01-17T18:41:25+5:302022-01-17T18:41:38+5:30

एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या महिलेने तिची कहानी शेअर केली आहे.

Bride asks for divorce day after wedding after groom weird cake on her face | लग्नाच्या दिवशीच पतीनं 'असं' काही केले; भडकलेल्या पत्नीनं मागितला थेट घटस्फोट

लग्नाच्या दिवशीच पतीनं 'असं' काही केले; भडकलेल्या पत्नीनं मागितला थेट घटस्फोट

Next

लग्नाचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास दिवस असतो. अनेक तरुण तरुणी लग्नाच्या दिवसासाठी विशेष प्लॅनिंग करत हा दिवस आयुष्यात नेहमी आठवणीत राहावा यासाठी प्रयत्न करतात. अशावेळी जर तुमच्या होणाऱ्या पार्टनरकडून काही चूक झाली तर तुम्ही काय कराल? सध्या सोशल मीडियावर एका नवरीचा किस्सा असाच व्हायरल झाला आहे. त्यात नवऱ्यानं केलेल्या कृत्यामुळे नवरी चांगलीच भडकली. तिने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवऱ्याशी घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली.

एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या महिलेने तिची कहानी शेअर केली आहे. या महिलेने सांगितले की, तिच्या पतीने लग्नाच्या दिवशीच तिच्या मर्जीविरोधात जे काही कृत्य केले त्यामुळे तिला अपमानास्पद जाणीव झाली. त्यामुळे तिने पतीसोबत न राहण्याचा निर्णय घेतला. पतीने केलेल्या कृत्यामुळे पत्नीला शरमेने मान खाली घालावी लागली. त्यामुळेच पतीला घटस्फोट देत त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय पत्नीने घेतला.

लग्नाच्या दिवशी नेमकं काय घडलं?

महिलेने सांगितले की, लग्नाच्या दिवशी जेव्हा केक कापण्याचा कार्यक्रम सुरु होता. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर केक लावू नये अशी पत्नीची इच्छा होती. तरीही पतीने तिच्या डोक्याला पकडून बळजबरीनं केकवर तोंड मारलं. केकमुळे महिलेचा चेहरा खराब झाला. जे तिला अजिबात आवडत नव्हतं. हे तिच्या पतीला माहिती होतं. तरीही पतीने सगळ्यांसमोर पत्नीचा चेहरा केकने खराब केला. त्यामुळेच भडकलेल्या पत्नीनं पतीसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. या महिलेचा पती तिचा बॉयफ्रेंड होता. त्याला पत्नीला काय आवडते काय नाही याची आधीच कल्पना होती. मात्र सगळ्यांसमोर पतीने केलेले कृत्य तिला अपमानस्पद वाटलं आणि तिने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला.

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मागितला घटस्फोट

महिलेने सांगितले की, तिचा पती वेगळ्या कप केकची वाट पाहत होता कारण तो आधीच असं करण्याच्या प्लॅनिंगमध्ये होता. या घटनेनंतर पत्नीने पतीला स्पष्ट शब्दात मला तुझ्यासोबत राहायचं नाही हे सांगून टाकलं. परंतु या क्षुल्लक कारणावरुन पत्नी उगाच मोठा वाद निर्माण करतेय असं पतीच्या कुटुंबीयांचे म्हणणं आहे. तिने लग्न मोडण्याचा निर्णय घेणे चुकीचं असल्याचं कुटुंबाने सांगितले. सोशल मीडियावर या घटनेवर नेटिझन्सनं नवऱ्याने केलेले कृत्य चुकीचं असल्याचं म्हटलं. तर मुलीला स्वत:चा निर्णय घेण्यास सांगितले.

Web Title: Bride asks for divorce day after wedding after groom weird cake on her face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app