'लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवू नका', हतबल झालेल्या सरकारकडून तरुणांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 11:18 AM2020-01-28T11:18:53+5:302020-01-28T11:22:42+5:30

सरकारने तरूणांना केलेल्या या आवाहनावर विरोधी पक्षाने जोरदार टीका केली आहे.

Brazil government appeal youths that do not have sex before marriage | 'लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवू नका', हतबल झालेल्या सरकारकडून तरुणांना आवाहन

'लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवू नका', हतबल झालेल्या सरकारकडून तरुणांना आवाहन

googlenewsNext

वेगवेगळ्या देशातील वेगवेगळे नियम आणि कायदे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. अशात ब्राझील देशातील सरकारने तरूणांना केलेलं एक आवाहन चांगलंच चर्चेचा विषय ठरत आहे. येथील सरकारने देशातील तरुणांना एक खासप्रकारचं आवाहन केलं आहे. या देशातील तरूणांच्या शारीरिक संबंधाच्या सवयीमुळे सरकार हैराण झालं असून त्यांनी तरूणांना 'लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवू नका' असं आवाहन केलंय.

ब्राझीलमध्ये गेल्या काही वर्षात एचआयव्ही एड्सच्या रुग्णांची संख्या वाढली असून लग्नाआधी गर्भधारणा होण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या घटनांमुळे सरकार हैराण झाल्याने त्यांना अशाप्रकारचं आवाहन करावं लागलं आहे. 

पार्टी करा, मजा-मस्ती करा. शारीरिक संबंध न ठेवताही तुम्ही मजा-मस्ती करु शकतात. मात्र, लग्नापूर्वी शारीरिक करु नका, असं आवाहन सरकारने केलं आहे. इतकेच नाही तर सरकारने याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी 'आय चूज ट वेट' नावाने एक मोहिमही सुरू केली आहे.

आपल्या लैंगिक गरजांवर संयम ठेवण्याचं आवाहन ब्राझीलमधील मानवाधिकार आणि कुटुंबकल्याण मंत्री डामारेस एल्वेस यांनी केलंय. ते म्हणाले की, तरुण-तरुणी वेगवेगळ्या कारणांनी शारीरिक संबंध ठेवतात. खासकरून पार्टी दरम्यान शारीरिक संबंधाचा ट्रेन्डच झालाय. जे अजिबात गरजेचं नाही.

दुसरीकडे या सरकारने तरूणांना केलेल्या या आवाहनावर विरोधी पक्षाने टीका केलीये. सरकारची ही भूमिका चुकीची असल्याचं ते म्हणाले. विरोधी पक्षाने म्हटले की, संयम ठेवण्याच्या नावाखाली तरुणांना जबरदस्तीने सेक्स करण्यास थांबण्याचं आवाहन करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.


Web Title: Brazil government appeal youths that do not have sex before marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.