This bracelet give you zap when you will eat junk food | एक असं ब्रेसलेट जे तुमच्या वाईट सवयींसाठी तुम्हाला देणार शॉक!
एक असं ब्रेसलेट जे तुमच्या वाईट सवयींसाठी तुम्हाला देणार शॉक!

वाईट सवयी या चांगल्या माणसातही असतात आणि वाईट माणसातही असतात. जंक फूड खाणं ही एक वाईट सवय आहे हे अनेकदा वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे. त्यामुळे वजन वाढण्यासोबतच वेगवेगळे आजार घरबसल्या होताहेत. पण जिभेला आवरणं इतकीही सोपं नाही. बर्गर, पिझ्झा, पाणीपुरी किंवा आणखीही काही चटपटीत पदार्थांचं नाव जरी काढली तरी तोंडाला पाणी सुटतं. अनेकांना यावर कंट्रोल करता येत नाही. पण यावर एक भन्नाट उपाय समोर आला आहे.

बाजारात एक असं ब्रेसलेट समोर आलं आहे जे जंक फूड खाल्ल्यावर तुम्हाला करन्ट मारेल. जर तुम्ही ऑनलाइन वेळ घालवत असाल, नखे खात असाल, जास्त जेवण करत असाल, स्मोकिंग करत असाल, फास्ट फूड खात असाल किंवा जास्त झोपत असाल तर या चुकीच्या सवयी सोडवण्यासाठी बाजारात Pavlok Bracelet आलं आहे. वरील सर्व गोष्टी तुम्ही करत असाल तर हे ब्रेसलेट तुम्हाला करन्ट मारेल. म्हणजे हे ब्रेसलेट तुमच्या या वाईट सवयी सोडवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

तुम्हाला इतकंच करायचं आहे की, या ब्रेसलेटमध्ये तुमच्या चुकीच्या सवयींची एक लिस्ट तयार करायची आहे. यातील जी गोष्ट तुम्ही कराल तेव्हा हे ब्रेसलेट तुम्हाला १५० Zaps चा शॉक देणार.

Pavlok Bracelet ची किंमतही तुम्हाला झटका देणारी अशीच आहे. अ‍ॅमेझॉनवर या ब्रेसलेटची किंमत १९९ डॉलर म्हणजेच १३ हजार ८९३ इतकी आहे. आता किंमत वाचल्यावर तर डोक्यात वेगवेगळे विचार सुरू झाले असतील. इतकंच काय तर असाही विचार करत असाल की, वाईट सवयी काय अशाच सोडवू, त्यासाठी ब्रेसलेटची काय गरज?


Web Title: This bracelet give you zap when you will eat junk food
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.