बापरे! 2 आठवड्यातून एकदाच आंघोळ करते गर्लफ्रेंड; 3 वर्षांच्या रिलेशननंतर बॉयफ्रेंडला समजलं सत्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 15:12 IST2022-10-24T15:10:31+5:302022-10-24T15:12:17+5:30

मुलीसोबत तो गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता. त्याच घरात तो जेव्हा शिफ्ट झाला तेव्हा ती मुलगी दोन आठवड्यातून एकदाच आंघोळ करते हे सत्य त्याला समजलं आणि मोठा धक्काच बसला.

boyfriend shocked as he learns girlfriend showers once every 2 weeks after 3 years of relationship | बापरे! 2 आठवड्यातून एकदाच आंघोळ करते गर्लफ्रेंड; 3 वर्षांच्या रिलेशननंतर बॉयफ्रेंडला समजलं सत्य 

बापरे! 2 आठवड्यातून एकदाच आंघोळ करते गर्लफ्रेंड; 3 वर्षांच्या रिलेशननंतर बॉयफ्रेंडला समजलं सत्य 

जेव्हा आपण एखाद्यासोबत नात्यात असतो तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टी जाणून घ्यायची उत्सुकता असते. अनेकवेळा जोडीदाराच्या चुकांकडे दुर्लक्ष करूनही लोक नातं पुढे नेतात, पण ही गोष्ट जर आपल्या मूलभूत स्वच्छतेशी निगडीत असेल तर कधी-कधी ती सहन करणं कठीण होऊ शकतं. असंच काहीसं एका तरुणासोबत घडलं, जेव्हा त्याला कळलं की त्याची गर्लफ्रेंड रोज आंघोळही करत नाही.

Reddit वर एका तरुणाने त्याच्यासोबत घडलेल्या घटनेचा संदर्भ देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या गर्लफ्रेंडच्या एका सवयीने तो हैराण झाला. त्या मुलीसोबत तो गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता. त्याच घरात तो माणूस जेव्हा शिफ्ट झाला तेव्हा ती मुलगी दोन आठवड्यातून एकदाच आंघोळ करते हे सत्य त्याला समजलं आणि मोठा धक्काच बसला.

तरुणीने म्हटलं की तो गर्लफ्रेंडसोबत तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. तो तिच्यावर खूप प्रेम करतो. पण जेव्हा तो लिव्ह इनमध्ये राहायला घरी शिफ्ट झाला. तेव्हा त्याला एक विचित्र गोष्ट कळली. त्याची गर्लफ्रेंड दोन आठवड्यातून एकदाच आंघोळ करते. तिच्या या वाईट सवयीमुळे त्याला घाण वाटू लागलं. तो वास टाळण्याचा प्रयत्न करत राहिला. 

खरंतर, त्याला तिला सोडायचंही नव्हत पण ही सवय त्याला सहन होत नव्हती. तिच्यासोबत राहेपर्यंत त्याला या सवयीची कल्पना नव्हती. तरुणाने ही सवय काही महिने सहन केली पण एक दिवशी त्याने ठरवलं की तो आता एका बेडवर झोपू शकत नाही. कारण, त्याला वास सहन करणं कठीण जात होतं असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: boyfriend shocked as he learns girlfriend showers once every 2 weeks after 3 years of relationship