शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

बॉयफ्रेन्ड इंटिमेट होताना गुपचूप करत होता हे काम, महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 15:07 IST

महिलेने सांगितलं की, तो माझ्यासोबत बोलण्यासाठी नेहमीच फ्री असायचा आणि मला दिवसरात्र मेसेज करत होता. तो मला आनंदी ठेवण्यासाठीही खूप काही करायचा.

रिलेशनशिपमध्ये अनेकदा अशा काही गोष्टी घडतात ज्या सहन करणं अवघड असतं. अनेकदा रिलेशनशिपमध्ये काही लोक समोरच्या व्यक्तीवर आपला हक्क गाजवतात, ज्यामुळे नातं बिघडू शकतं. अशीच एक घटना समोर आली आहे.  एका महिलेने सांगितलं की, 'डेटिंग अॅपच्य माध्यमातून मी आणि टॉम भेटलो. टॉम उंच, हॅंडसम आणि फनी व्यक्ती होता. पहिल्यांदाच बोलले असताना मला तो आवडला होता. महिलेने सांगितलं की, तसं तर डेटिंग अॅपवर तिचं प्रोफाइल मॅच झालं होतं. पण टॉम इतरांपेक्षा खूप वेगळा होता. त्याला याने काहीच फरक पडत नाही की, मी कशी आहे आणि लाइफबाबत मी काय विचार करते'.

महिलेने सांगितलं की, तो माझ्यासोबत बोलण्यासाठी नेहमीच फ्री असायचा आणि मला दिवसरात्र मेसेज करत होता. तो मला आनंदी ठेवण्यासाठीही खूप काही करायचा. टॉमला भेटण्याच्या काही दिवसांआधीच माझं ब्रेकअप झालं होतं. ज्यामुळे माझा आत्मविश्वास कमजोर झाला होता. तरीही मी त्याला भेटले.

महिलेने पुढे सांगितलं की, मी जेव्हा टॉमला भेटले तेव्हा मला जाणवलं की, तो फारच चांगला माणूस आहे. त्याच्या खूप गोष्टी मला आवडत होत्या. टॉमला भेटून मला वाटलं की, तो इतर तरूणांपेक्षा वेगळा आहे. आम्ही नेहमी पब्लिक प्लेसमध्येच भेटत होतो. ज्यानंतर मी माझ्या घरी एक पार्टी ठेवली. टॉम आणि काही मित्रांना बोलवलं. आम्ही पार्टीत खूप दारू प्यायलो. पार्टी झाल्यावर सगळे लोक गेले. पण टॉम गेला नव्हता. काही वेळ आम्ही काउचवर बसून बोलत होतो आणि मग बेडरूममध्ये गेलो. मी तेव्हाच ड्रॉवरमधून एक कंडोम काढला आणि त्याला दिला. आम्ही दोघे इंटिमेट झालो.

इंटिमेट झाल्यावर मला जाणवलं की, त्याने कंडोमचा वापर केला नाही. आम्हा दोघांमध्ये पहिल्यांदाच असं काही झालं होतं. मला नातं तोडायचं नव्हतं. त्यामुळे मी काही न बोलता गुपचूप झोपले. ब्रिटनमध्ये सेक्स दरम्यान विना सहमती कंडोम काढणं गुन्हा मानला जातो.

महिलेने सांगितलं की, पुढील वेळी मी आणि टॉम भेटलो तेव्हा मी त्याला कंडोम दिला. संबंधानंतर मी त्याला कंडोमबाबत विचारलं तर तो म्हणाला की, खाली कुठे पडलं असेल. मी रूममध्ये सगळीकडे कंडोम शोधला, पण मला सापडला नाही. यावर टॉम म्हणाला की, मी फारच गंभीर झालीये आणि मी याबाबत इतका विचार करायला नको.

ती म्हणाली की, तिसऱ्यांदा जेव्हा आम्ही भेटलो तेव्हाही त्याने तसंच केलं. मी चिडले तर टॉम म्हणाली मी वेडी आहे. मी जेव्हा टॉमला म्हणाले की, माझ्या सहमतीशिवाय कंडोमचा वापर न करणं एकप्रकारे रेप आहे. तेव्हा माझं बोलणं ऐकून तो जोरात हसला. तो पुन्हा म्हणाला की, मी उगाच सिरीअस होत आहे.

यानंतरही टॉमचं हे वागणं सुरूच होतं. एकदा त्याने जबरदस्ती माझ्यासोबत संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. अखेर मी त्याला माझ्या घरातून काढलं आणि खूप रडले. त्यानंतर एका महिलेसोबत माझी भेट झाली. तिने सांगितलं की, टॉम तिचा बॉयफ्रेन्ड आहे. त्या महिलेला एक मुलही आहे आणि ती प्रेग्नेंट होती. महिलेने फोनमध्ये टॉम आणि माझे मेसेज पाहिले होते. नंतर तिने मला टॉमपासून दूर राहण्यास सांगितलं.

महिलेने सांगितलं की, मी तिला विश्वास दिला की, माझ्यात आणि टॉममध्ये आता काहीच नाही. जेव्हा मी तिला पूर्ण सांगितलं तेव्हा ती मला म्हणाली की, मी फार जाड आणि कुरूप आहे. माझा फक्त भ्रम होता की, टॉमला माझ्यात इंटरेस्ट आहे.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटकेLondonलंडन