शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

त्यानं १०० नंबरवर फोन केला, भूत पकडायला पोलीस बोलावले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 13:00 IST

बहिणीला भूतापासून धोका असल्याचा तरुणाचा दावा

मिर्झापूर: एका तरुणानं चक्क भूत पकडायला पोलिसांना फोन केला. त्यामुळे पोलीसदेखील बुचकळ्यात पडले. बहिणीला भूतापासून धोका आहे. भूत तिच्या जीवावर उठल्यानं तुम्ही भूताला पकडा, अशी विनंती तरुणानं पोलिसांकडे केली. पोलिसांनी तरुणाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काहीही ऐकायला तयार नव्हता. उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये हा प्रकार घडला. मिर्झापूरच्या कलवारी माफी गावात राहणाऱ्या आनंद नावाच्या तरुणानं १०० नंबरवर फोन केला. त्यानं पोलिसांकडे मदत मागितली. 'तो माझ्या बहिणीचा जीव घेईल. तुम्ही कृपया माझ्या बहिणीला वाचवा,' अशी विनंती आनंदनं फोनवर केली. यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. तरुणाच्या बहिणीला मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला पकडण्याच्या तयारीनं पोलीस दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. मात्र घटनास्थळी पोहोचल्यावर तरुणानं त्याच्या बहिणीला भूताकडून धोका असल्याचा दावा केला. हे ऐकून पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांनी या प्रकरणी आनंदचे वडील कृष्ण कुमार यांच्याकडे विचारणा केली. मात्र आनंदनं कशासाठी पोलिसांना बोलावलं, याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं ते म्हणाले. त्यानंतर पोलिसांनी आनंदला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कोणाचंही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. 'माझ्या बहिणीवर एका व्यक्तीनं भूत सोडलं आहे. त्यामुळेच तिच्यावर उपचारांचा परिणाम होत नाही. त्या भूताला पकडल्याशिवाय बहिणीची प्रकृती सुधारणार नाही,' असं आनंदनं पोलिसांना सांगितलं. या घटनेचा पोलिसांनी तयार केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस