शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना निवडणूक आयोगाचा दिलासा; आचारसंहिता भंग प्रकरणी क्लीन चिट
2
"जितकं जास्त मतदान होईल, तितकी..."; दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन
3
महामुंबईच्या १० जागांसाठी आजपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ; ३ मे पर्यंत मुदत
4
राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड; अधिकाऱ्यांची धावपळ, मतदार रांगेत ताटकळले
5
पुढचे चार दिवस राज्यात येणार उष्णतेची लाट; बंगाल-ओडिशामध्ये उष्णतेचा रेड अलर्ट
6
मुंबईत देशातील सर्वात मोठ्या गर्डरची जोडणी यशस्वी, कोस्टल रोडच्या शिरपेचात मानाचा तुरा
7
मोठी दुर्घटना! लग्नातील फटाक्यांमुळे घराला भीषण आग; सिलिंडरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू
8
भारताने अमेरिकेला सुनावले, परराष्ट्र मंत्रालय म्हणाले- "दुसऱ्यांना शिकवू नका, आधी स्वत:कडे बघा"
9
Kotak Mahindra Bank : RBI ची एक कारवाई उदय कोटक यांना पडली महागात, बसला १०,३२८ कोटींचा फटका
10
चीनने सियाचीनमध्ये बांधला काँक्रीटचा रस्ता; सॅटेलाईट इमेजनं ड्रॅगनचं बिंग फुटले
11
"भाजपासोबत सत्तेत गेल्यानंतर शरद पवार समर्थन देणार होते, 'त्या' भेटीगाठी ठरवून झाल्या"
12
JioCinema प्रीमियम प्लान: ₹१ पेक्षा कमीमध्ये सबस्क्रिप्शन, बिघडवणार का Netflix आणि Amazon Prime खेळ?
13
'दिवसाला दोन तीन सिगरेट ओढायचे', विद्या बालनचा खुलासा; 'डर्टी पिक्चर' नंतर लागलं व्यसन
14
कसा होता भारताचा वारसा कर कायदा?; माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केला होता रद्द
15
Opening Bell : शेअर बाजाराची सकारात्मक सुरूवात, टेक महिंद्रा १० टक्क्यांनी वाढला, आयटीमध्ये तेजी
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यातील ८ जागांसाठी आतापर्यंत किती टक्के मतदान? जाणून घ्या...
17
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, सुखाचे प्रसंग येतील
18
ईव्हीएममध्ये बिघाड, खासदारांचे मतदान थांबले; ४० मिनिटं करावी लागली प्रतीक्षा
19
मामा असावा तर असा! ८ वर्षांचे मतभेद विसरून आरती सिंहच्या लग्नाला गेला गोविंदा, पाहा व्हिडिओ
20
इंडिया आघाडीला सपाचा पाठिंबा; उद्धवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरणार

आता जगणं, मरणं यांच्याचसोबत! गुरुजींना घेऊन विद्यार्थिनी फरार; अजब प्रेमाची गजब कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2022 8:47 PM

मी गुरुजींना घेऊन पळालेय; आता जगेन तर यांच्यासोबत आणि मरेनही यांच्याचसोबत; तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

बेतिया: बिहारच्या बेतियामध्ये एक अजब घटना घडली आहे. एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तरुणीचं नाव काजल आहे. व्हिडीओमध्ये ती स्वत:च्या लग्नाबद्दल बोलत आहे. मी माझ्या प्रियकर शिक्षकाला घेऊन पळाले आहे. माझे आई, वडील, भाऊ या लग्नाच्या विरोधात आहेत. त्यामुळे माझ्याकडे पळून जाण्याशिवाय पर्याय नव्हता, असं काजलनं व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

काजल (१९ वर्षे) काही दिवसांपूर्वी घरातून पळाली. तिनं लिहिलेलं पत्र आणि तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'माझे आणि गुरुजींचे बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते. मी त्यांच्याकडे कोचिंगला जायचे. तेव्हापासून आमच्यात संवाद सुरू झाला. तीन महिन्यांपूर्वी मी शिकवणीला जायचं बंद केलं. मी आणि गुरुजी संपर्कात होतो. मात्र माझ्या कुटुंबीयांचा याला विरोध होता. त्यांनी यावरून मला मारहाण केली,' असं काजलनं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

'मी माझ्या प्रियकराला, शिक्षक बंधू चौधरींना घेऊन पळाले आहे. आता मी जगेन तर बंधू चौधरींसोबत आणि मरेन तर बंधू चौधरींसोबत. माझे कुटुंबीय मला मारण्याच्या तयारीत होते. मग मी काय केलं असतं? त्यामुळेच मी पळून यांच्याकडे आले आणि यांना पळवून नेलं. माझ्या कुटुंबीयांनी नवलपूर पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार खोटी आहे. मी आता यांच्याच सोबत राहीन. आम्ही लग्न केलं आहे,' अशा शब्दांत काजलनं तिची अडचण आणि घटनाक्रम सांगितला.

काजल कुमारी बेतियाच्या नवलपूरची रहिवासी आहे. काजल कुमारी आणि शिक्षक बंधू चौधरी यांचे प्रेमसंबंध होते. घरच्यांचा विरोध असल्यानं काजल शिक्षक चौधरींना घेऊन फरार झाली. आता काजलनं तिच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. तिच्या कुटुंबीयांना बंधू चौधरींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून दोघांचा शोध सुरू आहे.