बाबो! 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात केली तब्बल ७,१०,६२२ रूपयांनी वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 11:48 AM2019-09-26T11:48:55+5:302019-09-26T11:49:46+5:30

जेव्हाही नव्या आर्थिक वर्षाला सुरूवात होते, तेव्हा प्रत्येकाच्या मनात पगाराबाबत वेगवेगळे प्रश्न सुरू असतात. प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या असतात.

Best boss ever this CEO announces Rs 710622 raise for all his employees | बाबो! 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात केली तब्बल ७,१०,६२२ रूपयांनी वाढ!

बाबो! 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात केली तब्बल ७,१०,६२२ रूपयांनी वाढ!

Next

(Image Credit : humanresourcesonline.net)

जेव्हाही नव्या आर्थिक वर्षाला सुरूवात होते, तेव्हा प्रत्येकाच्या मनात पगाराबाबत वेगवेगळे प्रश्न सुरू असतात. प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. पण अप्रेजल लेटर हाती आल्यावर अनेकांचा अपेक्षाभंग होतो. पण अमेरिकेतील डॅन प्राइस या व्यक्तीच्या कंपनीतील लोकांना इतका पगार वाढवून मिळाला की, तुम्ही कल्पना देखील करू शकत नाहीत. या कंपनीतील पगाराची आकडेवारी पाहून नक्कीच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.

cbsnews.com ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील Idaho मध्ये 'ग्रॅव्हिटी पेमेंट्स' नावाची एक कंपनी असून या कंपनीचे सीईओ डॅन आहेत. रिपोर्ट्सनुसार, डॅनने त्यांच्या कंपनीतील लोकांचा पगार तब्बल १० हजार डॉलर म्हणजे ७,१०,६२२ रूपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. असे सांगितले जाते की, या कंपनीतील सर्वात कमी पगार असलेला कर्मचारी देखील वर्षाला २८,४२,४८८ रूपये कमावतो.

इतकेच डॅनने निर्णय घेतला आहे की, ते येणाऱ्या ५ वर्षात कर्मचाऱ्यांच्या पगारात ४९,७४,३५४ रूपयांची वाढ करणार आहेत. हे त्यांचं लक्ष्य आहे. डॅन यांची ही कंपनी क्रेडिट कार्ड प्रोसेसिंग बिझनेसमध्ये आहे. या कंपनीने नुकतीच ChargeItPro नावाची कंपनी घेतली. नवीन ऑफिसही खरेदी केलं. नव्या ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी खास घोषणाही करण्यात आली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे सांगितले जाते की,  याआधी २०१५ मध्ये डॅन प्राइसने स्वत:च्या पगारात ८० ते ९० टक्के कपात केली होती. तेव्हा त्यांनी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना ७० हजार डॉलर पगाराची घोषणा केली होती. त्यांनी एका वेबसाइटशी बोलताना सांगितले की, 'मी समस्यांचा भागीदार होऊन शकलो आहे, मला समाधानाचा भागीदार व्हायचं आहे. आधी मी दर वर्षी एक मिलियन डॉलरची कमाई करत होतो, तर माझे कर्मचारी केवळ ३० हजार डॉलरचीच कमाई करत होते'.

Web Title: Best boss ever this CEO announces Rs 710622 raise for all his employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.