शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

काय सांगता! ...म्हणून एका अस्वलाला सुनावली गेली चक्क मृत्युदंडाची शिक्षा, अनेकांनी केला विरोध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 11:41 IST

गेल्या आठवड्यात ट्रेंटिनोच्या उत्तर क्षेत्रात एक वडील आणि मुलगा हायकिंगसाठी गेले होते. तेव्हा त्यांच्यावर अस्वलाने जीवघेणा हल्ला केला होता.

आतापर्यंत तुम्ही माणसाला मृत्युदंडाची शिक्षा झाल्याचं ऐकलं असेल, पण कधी तुम्ही एखाद्या अस्वलाला मृत्युदंडाची शिक्षा झाल्याचं ऐकलं का? नाही ना? पण आता अशीच एक घटना समोर आली आहे. सीएनएनने दिलेल्या एका वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात ट्रेंटिनोच्या उत्तर क्षेत्रात एक वडील आणि मुलगा हायकिंगसाठी गेले होते. तेव्हा त्यांच्यावर अस्वलाने जीवघेणा हल्ला केला होता. याच गुन्ह्याखाली अधिकाऱ्यांनी अस्वलाला चक्क मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. 59 वर्षीय फेबिओ मिस्सरोनी त्यांचा 28 वर्षीय मुलगा क्रिश्चियनसोबत माउंट पेलरच्या रस्त्याने जात होते. तेव्हा अचानक रस्त्यात अस्वल आलं आणि त्याने त्यांच्यावर हल्ला केला.

क्रिश्चियनने सीएनएनला सांगितले की, 'अस्वलाने त्याचा पाय धरला तोंडात धरला होता. मला सोडवण्यासाठी वडिलांनी अस्वलाच्या पाठीवर उडी घेतली. मी तर अस्वलाच्या तावडीतून सुटलो, पण अस्वलाने त्यांच्या पायाचा तीन जागी लचका तोडला. नंतर मी अस्वलाचं लक्ष भटकवण्यासाठी टाळ्या वाजवल्या. तेव्हा अस्वल जंगलाकडे पळून गेलं'. 

या हल्ल्यानंतर ट्रेटिनो गव्हर्नर Maurizio Fugatti यांनी अस्वलाला पकडण्यासाठी आणि मारण्यासाठी आदेशांवर सही केली. फिरायला गेलेल्या वडील-मुलाच्या जखमेतून मिळालेल्या लाळेतून आणि कपड्यांवर मिळालेल्या डीएनएच्या माध्यमातून अस्वलाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अनेक संस्थांनी या निर्णयावर टीका केली आहे. इटलीच्या वर्ल्ड वाइल्डलाईफ फंड ब्रॅंचने एक ऑनलाइन पीटिशन सुरू केली आहे. जी 22 हजार लोकांनी साइन केलीये. तसेच इटलीचे पर्यावरण मंत्री या आदेशा विरोधात आहेत. ते म्हणाले की, 'होऊ शकतं की, मादा आपल्या पिल्लांचा बचाव करत असेल'.

दरम्यान, गेल्या महिन्यात एका 12 वर्षीय मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. उत्तर इटलीमध्ये एका मुलाचा सामना एका ब्राउन अस्वलासोबत झाला होता.

वाह रे पठ्ठ्या! वृद्ध वडील होते दूर अन् फ्लाइट होत्या बंद, समुद्रातून एकटा बोट चालवत 85 दिवसांनी घरी पोहोचला....

खोदकाम करताना मजूराला सापडला खजिना, मडक्यात जे दिसलं ते पाहून लोक झाले अवाक्...

टॅग्स :ItalyइटलीJara hatkeजरा हटकेCourtन्यायालयInternationalआंतरराष्ट्रीय