शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बी अ गुड बॉय! मुलाखतकार घाबरल्याचं पाहून Ratan Tata यांनी श्वानाला प्रेमानं समजावलं; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 15:02 IST

उद्योजक आणि टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) हे आपल्या प्रेमळ स्वभावामुळे आणि नि:स्वार्थ कार्यामुळे ओळखले जातात. ...

उद्योजक आणि टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) हे आपल्या प्रेमळ स्वभावामुळे आणि नि:स्वार्थ कार्यामुळे ओळखले जातात. रतन टाटा हे श्वानप्रेमी आहेत हे एक उघड गुपितच आहे. लोकोपयोगी कार्य आणि त्यांच्या दयाळूपणाबाबत ते परिचित आहेतच. टाटा समुहाचं (TATA Group) मुंबईत जागतिक मुख्यालय आहे. पण तुम्हाला माहितीये का या जागतिक मुख्यालयात भटक्या श्वानांसाठीही घर बांधण्यात आलंय?

याच भटक्या श्वानांमध्ये गोवा नावाचाही एक श्वान आहे. जेव्हा रतन टाटा या कार्यालयात मीटिंगसाठी येतात तेव्हा 'गोवा' देखील त्यांच्यासोबत कार्यालयात उपस्थित असतो. परंतु तुम्हाला माहितीये 'गोवा' अन्य लोकांसोबत आणि विशेषत: ज्यांना श्वानांची भीती वाटते त्यांच्यासोबत कसा असतो? टाटांच्या कार्यालयात गेलेल्या मुलाखतकारनं आपल्याला आलेला अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. ह्युमन्स ऑफ बॉम्बेच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा मेहता यांनी लिंक्डइन (LinkedIn) वर यासंदर्भात एक स्टोरी शेअर केली आहे.

झालं असं की मुलाखत घेणाऱ्या महिलेला श्वानांची भीती वाटत होती. परंतु रतन टाटा यांची भेट आणि मुलाखत घेण्यासाठी त्यांनी मोठी वाटही पाहिली होती. त्यामुळेच आपण श्वानांना थोडं भीतो या त्या उघडपणे टाटांना सांगू शकल्या नाहीत. परंतु जेव्हा त्यांनी टाटांचे कार्यकारी सहाय्यक शंतनू नायडू यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या टाटांनी ती गोष्ट ऐकली आणि त्यांना तुम्ही ठीक आहात ना अशी विचारणाही केली.

... तेव्हा टाटांनी 'गोवा'ला प्रेमानं समाजवलंजेव्हा नायडू यांनी टाटांना मुलाखतकार श्वानांना थोड्या घाबरत असल्याचं सांगितलं, तेव्हा टाटांच्या चेहऱ्यावर थोडं हास्य आलं आणि ते 'गोवा' या श्वानाला समजावण्यासाठी त्याच्याकडे गेले. "गोवा त्यांना तुझी भीती वाटतेय, बी अ गुड बॉय," असं टाटांनी त्याला समजावून सांगितलं आणि त्यानंतर त्यांना मुलाखतीसाठी येण्याची विनंती केली.

"मी तब्बल ३०-४० मिनिटं त्या ठिकाणी होते. परंतु गोवा माझ्याजवळ बिलकुल आला नाही. यामुळे मी खरंच चकित झाले, यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं," असं मेहता यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यानंतर टाटांनी खुलासा करत 'गोवा' हा एक भटका श्वान आहे आणि त्याला दत्तक घेतलं असल्याचं टाटांनी सांगितल्याचंही त्यांनी नमूद केलंय.

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटाJara hatkeजरा हटके