शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Citizenship Rule ३६ हजार फूट उंचीवर विमानात झाला बाळाचा जन्म, पण आता नागरिकत्वावरून गोंधळ, जाणून घ्या पुढे काय झालं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 21:37 IST

बाळाला घेऊन माता दुतावासात पोहोचली, त्यानंतर तिला एक नियम समजला.

Weird News, Citizenship Rule: कल्पना करा जर एखादी गर्भवती महिला ३६,००० फूट उंचीवर विमानात प्रवास करत असेल आणि तिला अचानक प्रसूती वेदना जाणवू लागल्या, तर विमानात जन्मलेल्या मुलाला कोणत्या देशाचे नागरिकत्व मिळेल? तुम्हीही गोंधळून गेलात ना... पण अशीच एक घटना अमेरिकेतील एका महिलेसोबत घडली आणि तिला अशाच गोंधळाला सामोरे जावे लागले. मात्र, एक दिलासादायक बाब म्हणजे विमानातील अधिकाऱ्यांनी बाळाच्या नागरिकत्वाची योग्य माहिती दिल्याने साऱ्यांच्या जीवात जीव आला.

२१ वर्षीय गर्भवती महिलेने विमानामध्ये प्रवास केला-

रिपोर्टनुसार, अमेरिकेतील कनेक्टिकट प्रांतात राहणारी २१ वर्षीय कांड्रिया रोडेन ३२ आठवड्यांची गर्भवती होती. तिच्या प्रसूतीच्या तारखेला एक महिना बाकी होता. म्हणूनच ती आपल्या बहिणीसोबत अमेरिकेतून डोमिनिकन रिपब्लिक देशात जात होती. फ्लाइटमध्ये प्रवास करण्यापूर्वी, केंड्रा रोडेन यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता आणि त्यांच्या संमतीनंतरच ती फ्लाइटमध्ये बसण्यास तयार झाली होती.

३६ हजार फूट उंचीवर बाळाला जन्म दिला-

३६ हजार फूट उंचीवर जेव्हा विमान उडत होते, तेव्हा तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या. तिची बहीण आणि केबिन क्रू तिला विमानाच्या मागच्या बाजूला घेऊन गेले, जिथे तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. केंड्राने या बाळाचे नाव 'स्कायलेन' ठेवले आहे. डॉमिनिकन रिपब्लिक देशात पोहोचल्यावर, तिला आणि मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे ती ४ दिवसांसाठी दाखल झाली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती डोमिनिकन रिपब्लिकमधील अमेरिकन दूतावासात पोहोचली.

बाळाच्या नागरिकत्वावरून गोंधळ

आपल्या मुलाचे नागरिकत्व काय असेल, या संभ्रमात केंड्रा होती. त्याला अमेरिकन नागरिकत्व मिळू शकेल की ते नाकारले जाईल, असा प्रश्न तिला पडला होता. मुलाच्या जन्माची कहाणी जाणून घेतल्यानंतर, दूतावासातील कर्मचार्‍यांनी दिलेले उत्तर जाणून केंड्राला आनंद झाला. कर्मचार्‍यांनी तिला सांगितले की, USA Citizenship Ruleनुसार, जर एखाद्या अमेरिकन महिलेने फ्लाइटमध्ये असताना मुलाला जन्म दिला, तर बाळाला आपोआप अमेरिकन नागरिकत्व मिळते. जरी महिला कोणत्याही देशातील विमानात असली तरीही नियम तोच असतो. त्यामुळे केंड्राला दिलासा मिळाला.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिकाnew born babyनवजात अर्भकairplaneविमान