शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

ऑस्ट्रेलियाची महिला, तोडांचे ऑप्रेशन केले आणि बोलू लागली आयरीश अ‍ॅसेंटमध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 19:56 IST

अजब महिलेची गजब कहाणी; मुळची ऑस्ट्रेलियाची, तोडांचे ऑप्रेशन केले आणि बोलू लागली आयरीश अ‍ॅसेंटमध्ये

ऐकावं ते नवलच. अहो खरंच, बोलतोय आम्ही. आता तुम्हीच सांगा जर तोंडाचं ऑप्रेशन झाल्यावर कोणी मराठी भाषा तामीळ भाषेच्या ठेकात बोलू लागलं तर काय म्हणावं? अशीच गत एका ऑस्ट्रेलियन महिलेची झालीयं. या महिलेनं तोंडाच ऑप्रेशन काय केलं ती स्वत:चा मुळ भाषेतील अ‍ॅसेंटमध्ये विसरून गेली आणि चक्क आयरीश अ‍ॅसेंटमध्ये बोलायला लागली. गी मक्येन असं या महिलेचं नाव.

कसं झालं हे?

अहो त्याचं झालं असं की गीचं टॉन्सिल्सचं ऑप्रेशन झालं. काही काळाच्या अवधीनंतर ती चक्क आयरीश अ‍ॅसेंटमध्ये बोलू लागली. आश्चर्य म्हणजे गी कधी आर्यलंडला गेलीही नाही कि कोणत्या आयरिश व्यक्तीला भेटली नाही. तिने तिच पूर्ण आयुष्य ऑस्ट्रेलियातच घालवलं असं तीच म्हणनं आहे. तिनं टिकटॉक या सोशल मिडिया अ‍ॅपवर एक व्हिडिओच पोस्ट केला आहे. ज्यात ती म्हणते कि मला स्वप्नातूनच उठल्यासारखं वाटतंय. मला ऑस्ट्रेलियन अ‍ॅसेंटमध्ये बोलताच येत नाहीये. याबाबत ती डॉक्टरांना अनेकदा भेटली. त्यांनी केलेल्या रिसर्चनंतर असं समोर आलंय की ती 'फॉरेन अ‍ॅसेंट सिंड्रोम'ने ग्रासलेली आहे. खरंतर हा सिंड्रोम ब्रेन सर्जरी झालेल्या लोकांना होण्याची शक्यता असते.

जगात आतापर्यंत अशा १०० केसेस१९०७ सालापर्यंत या सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या एकूण १०० केसेसच आतापर्यंत समोर आल्या आहेत. गी ला जेव्हा लक्षात आलं की ती आयरिश अ‍ॅसेंटमध्ये बोलतेय तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली आणि डॉक्टर म्हणाले की सध्या ती रिकव्हर होतेय त्यामुळे असं होतंय. तिचा टिकटॉक व्हिडिओ पाहुन सोशल मिडियावरील लोकही अवाक् झाले आहेत.

गी प्रचंड त्रस्त आहेगी चा विश्वासच बसत नाहीये की तिचा ऑस्ट्रेलियन अ‍ॅसेंट सापडत नाहीये. तिने अनेक डॉक्टरांकडे चकरा मारल्या. पण तिला काहीच समाधान मिळतं नाहीये. ती म्हणाली, ''मी अशा डॉक्टरच्या शोधात आहे जो मला पूर्ण बरं करेल." तिला असा एक डॉक्टर मिळालाही आहे ज्याला, ती लवकर भेटेल.

समाजमाध्यमांवर तर गीच्या या व्हिडिओची खूप चर्चा आहे. कोणी तिला खोटं ठरवतंय तर कोणी तिच्याबद्दल सहानभूती व्यक्त करतंय.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAustraliaआॅस्ट्रेलियाIrelandआयर्लंड