शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मंगळावरुन पृथ्वीवर कोसळलेल्या सर्वात मोठ्या उल्कापिंडाचा लिलाव; किंमत ₹34 कोटी, काय खास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 14:11 IST

हा पृथ्वीवर कोसळलेला मंगळाचा सर्वात मोठा तुकडा आहे.

अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये या शतकातील सर्वात अनोखा लिलाव होणार आहे. जगातील प्रसिद्ध लिलाव कंपनी सोथेबीजने मंगळ ग्रहावरुनपृथ्वीवर कोसळलेल्या सर्वात मोठ्या उल्कापिंडाचा(NWA 16788) लिलाल आयोजित केला आहे. या उल्कापिंडाचे वजन 24.5 किलो (54 पौंड) असून, त्याची किंमत तब्बल 2 मिलनय ते 4 मिलियन डॉलर्स (सुमारे 15 ते 34 कोटी रुपये) असू शकते. हा लिलाव येत्या 16 जुलै 2025 रोजी न्यू यॉर्कमध्ये होणार आहे.

NWA 16788 म्हणजे काय?NWA 16788 हा मंगळावरुन पृथ्वीवर कोसळलेला एक उल्कापिंड आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये आफ्रिकेतील नायजर देशातील अगाडेझ भागातील सहारा वाळवंटात एका शिकारीने त्याचा शोध लावला होता. हा दगड खूप खास आहे. कारण तो पृथ्वीवर आढळणारा मंगळाचा सर्वात मोठा तुकडा आहे. त्याचे वजन 24.67 किलो असून, हा यापूर्वी सापडलेल्या उल्कापेक्षा 70% मोठा आहे.

अतिशय दुर्मिळ पृथ्वीवर आतापर्यंत 77,000 हून अधिक उल्कापिंड सापडले आहेत, परंतु त्यापैकी फक्त 400 उल्कापिंड मंगळावरील आहेत. NWA 16788 हे या 400 उल्कापिंडांपैकी 6.5%, म्हणजेच अत्यंत दुर्मिळ आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, लाखो वर्षांपूर्वी मंगळावर एक मोठा उल्कापिंड आदळला होता. या टक्करमुळे मंगळाचा हा तुकडा अवकाशातून पृथ्वीवर कोसळला. या उल्कापिंडाचा रंग लाल-तपकिरी आहे, जो मंगळाच्या मातीसारखा दिसतो. त्याच्या काही भागांमध्ये काचेसारखा थर आहे, जो अवकाशात वेगाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यावर तयार झाला. त्यातील 21.2% भाग मास्केलिनाइट (एक प्रकारचा काच), पायरोक्सिन आणि ऑलिव्हिन सारख्या खनिजांपासून बनलेला आहे.

हा मंगळाचा तुकडा आहे, हे कसे सिद्ध झाले?या उल्कापिंडाचा एक छोटासा तुकडा शांघाय खगोलशास्त्र संग्रहालयात तपासणीसाठी पाठवण्यात आला. तेथे शास्त्रज्ञांनी त्याची रचना आणि खनिजे तपासली आणि तो मंगळावरुन आल्याची पुष्टी केली. जून 2024 मध्ये हवामानशास्त्र संस्थेनेही त्याला मान्यता दिली. त्याच्या पृष्ठभागावर फारच कमी गंज किंवा नुकसान आहे, याचा अर्थ असा की तो अलीकडेच पृथ्वीवर पडला असावा.

लिलावाचे खास मुद्देसोथेबीजचा हा लिलाव 'गीक वीक'चा भाग आहे, ज्यामध्ये अवकाश आणि विज्ञानाशी संबंधित अनोख्या गोष्टी विकल्या जातात. NWA 16788 हा 8 ते 15 जुलै दरम्यान न्यू यॉर्कमधील सोथेबीज शोरुममध्ये प्रदर्शित केला जाईल, जेणेकरून लोक तो पाहू शकतील. लिलाव 16 जुलै रोजी दुपारी 2 वाजता (UTC) सुरू होईल. तज्ञांचा अंदाज आहे की, हा उल्कापिंड 2 ते 4 दशलक्ष डॉलर्समध्ये विकला जाऊ शकतो. 

यापूर्वीही असा लिलाव झालेलामंगळावरील उल्कापिंड यापूर्वी लिलावात विकले गेले आहेत, परंतु NWA 16788 त्याच्या आकार आणि दुर्मिळतेमुळे सर्वात खास आहे. 2021 मध्ये माली येथे सापडलेल्या ताओडेनी 002 उल्कापिंडाचे वजन 14.51 किलो होते, परंतु एनडब्ल्यूए 16788 त्यापेक्षा खूपच मोठे आहे. गेल्या वर्षी, सोथेबीज येथे स्टेगोसॉरसचा जीवाश्म 44.6 दशलक्ष डॉलर्सला विकला गेला होता. 

टॅग्स :Marsमंगळ ग्रहJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिकाEarthपृथ्वी