(Image Credit : siberiantimes.com)
स्मार्टफोनचं चलन गेल्या काही वर्षांपासून वेगाने वाढत आहे. पण रशियातील तुवामध्ये पुरातत्ववाद्यांना २१०० वर्ष जुनी एक अशी वस्तू सापडली जी आताच्या आयफोनसारखी दिसते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे २१०० वर्ष जुन्या एका सांगाड्याजवळ ही वस्तू सापडली. त्यामुळे आता अनेक नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
येथील पुरातत्ववाद्यांच्या एका टीमने २, १३७ वर्ष जुना एका सांगाडा शोधला. या सांगाड्याची खासियतमध्ये याच्या जवळ आयफोनसारखी दिसणारी एक वस्तू सापडली. हा काही अॅपलचा आयफोन नाही. पण या वस्तूची बनावट बिल्कुल आयफोनसारखी सांगितली जात आहे.
मीडियात रिपोर्ट्सनुसार, संशोधकांना नताशा नावाच्या एका महिलेच्या कबरेतून एक आश्चर्यकारक वस्तू मिळाली आहे. संशोधकांचं असं मत आहे की, कबरेतून मिळालेला सांगाडा इसपू तिसऱ्या शताब्दीमधील आहे. त्यांच्यानुसार, प्राचीन मंगोलियामधील जिओनाग्रू काळातील हे कबर आहे.
महिलेल्या कबरेजवळ एक स्मार्टफोनसारखी वस्तू मिळाली आहे. वास्तवात ही वस्तू दगडाचा एक तुकडा आहे. ज्यावर किंमती रत्न लावलेले आहेत. या दगडावर जे रत्न आहे त्यात कारेलियन, फिरोजा आणि मोत्यांचा समावेश आहे. हे रत्न आयफोनपेक्षा अधिक किंमतीचे आहेत. संशोधक आता यावर अधिक शोध घेत आहेत.