April Fool History and Origin: दरवर्षी १ एप्रिलला जगभरात ‘एप्रिल फूल डे’ साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना विनोदी पद्धतीने मूर्ख बनवतात, फसवतात, खोड्या काढतात. मात्र या दिवसाचा इतिहास केवळ मस्करीशी संबंधित नसून, तो युरोपमधील कॅलेंडर बदलाशी जोडलेला आहे.
ग्रेगोरियन कॅलेंडरमुळे झाली सुरुवात
एप्रिल फूल डेची सर्वात प्रचलित कथा 1582 मध्ये फ्रान्सने ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारल्यापासून सुरू होते. यापूर्वी युरोपमध्ये नवीन वर्षाची सुरुवात १ एप्रिलपासून मानली जात होती. मात्र नवीन कॅलेंडर लागू झाल्यानंतर नवीन वर्षाची तारीख १ जानेवारी करण्यात आली.
हा बदल अनेक लोकांना मान्य नव्हता. काही लोकांनी एप्रिलमध्येच नवीन वर्ष साजरे करणे सुरू ठेवले. अशा लोकांची थट्टा केली जाऊ लागली आणि त्यांना ‘एप्रिल फूल’ असे म्हटले जाऊ लागले. हळूहळू ही परंपरा वाढत गेली आणि एप्रिल फूल डेची सुरुवात झाली असे मानले जाते.
प्राचीन रोमच्या उत्सवाशीही संबंध
इतिहासकारांच्या मते, एप्रिल फूल डेचा संबंध प्राचीन रोममधील ‘हिलेरिया फेस्टिवल’ शी देखील आहे. हा उत्सव मार्चच्या शेवटी देवी सायबेलेच्या सन्मानार्थ साजरा केला जात होता. या उत्सवात लोक वेगवेगळ्या वेशभूषा करून मित्र-नातेवाईकांची मजा घेत असत, त्यांची थट्टा करत असत. त्यामुळे काही इतिहासकार मानतात की, एप्रिल फूल डेची परंपरा या उत्सवातून विकसित झाली.
18व्या शतकात संपूर्ण युरोपमध्ये पसरला ट्रेंड
इतिहासकारांच्या मते, 18व्या शतकापर्यंत १ एप्रिलला लोकांना मूर्ख बनवण्याची परंपरा इंग्लंड आणि संपूर्ण युरोपमध्ये पसरली. नंतर ही परंपरा हळूहळू जगभर पोहोचली.
Web Summary : April Fool's Day, celebrated globally on April 1st, traces back to the 16th-century adoption of the Gregorian calendar. Those resisting the New Year shift to January 1st were mocked, evolving into the prank-filled tradition we know today, possibly linked to ancient Roman festivals.
Web Summary : अप्रैल फूल दिवस, जो 1 अप्रैल को विश्व स्तर पर मनाया जाता है, 16वीं शताब्दी में ग्रेगोरियन कैलेंडर को अपनाने से जुड़ा है। 1 जनवरी को नए साल में बदलाव का विरोध करने वालों का उपहास उड़ाया गया, जो आज हम जानते हैं, शरारत से भरी परंपरा में विकसित हुआ, जो संभवतः प्राचीन रोमन त्योहारों से जुड़ा है।