April Fool 2018 : एप्रिल फूल करण्याच्या काही मजेदार आयडियाच्या कल्पना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 16:30 IST2018-03-30T16:30:24+5:302018-03-30T16:30:24+5:30
अनेकजण नवनवीन आयडियाच्या कल्पना शोधून एप्रिल फूल करतात. अशाप्रकारच्या काही कल्पना या व्हिडीओत करण्यात आल्या आहेत.

April Fool 2018 : एप्रिल फूल करण्याच्या काही मजेदार आयडियाच्या कल्पना
मुंबई : १ एप्रिल ही तारीख जसजशी जवळ येते तरुणाईमध्ये एक वेगळाच आनंद बघायला मिळतो. अलिकडे मित्रांना एप्रिल फूल बनवण्याचा ट्रेन्ड वाढला आहे. या दिवशी अनेकजण आपल्या मित्र-मैत्रीणींना खोटंखोटं काहीतरी सांगतात. आणि त्यांना एप्रिल फूल करतात. यासाठी अनेक दिवसांपासून प्लॅनही केले जातात. अनेकजण नवनवीन आयडियाच्या कल्पना शोधून एप्रिल फूल करतात. अशाप्रकारच्या काही कल्पना या व्हिडीओत करण्यात आल्या आहेत.
अनेकजण काही गमतीदार मॅसेजेस पाठवूनही अनेकांना एप्रिल फूल करतात. तर अनेकजण काहीतरी धमाकेदार करतात. खासकरून मित्रांनाच एप्रिल फूल अधिक प्रमाणात केलं जातं. कारण, मित्रांना राग कमी येतो. पण ही गंमत करताना अनेकांना मोठा झटकाही बसतो. त्यामुळे एप्रिल फूल करताना अशा गोष्टी तुम्हीही करू नका ज्यामुळे समोरच्याचं मोठं नुकसान होईल किंवा समोरच्या व्यक्तीला इजा होईल. पण या व्हिडीओत दाखवण्यात आलेल्या या गमतीदार गोष्टी बघून तुम्ही आनंद घेऊ शकता.