कुत्रीच्या रक्तदानासाठी फेसबुकवर आवाहन

By Admin | Updated: July 9, 2014 16:51 IST2014-07-09T16:51:55+5:302014-07-09T16:51:55+5:30

रक्तदान हे श्रेष्ठदान मानलं जातं. मग त्याची गरज प्राण्यांनाही असू शकते. माणूसकी दाखवणारी अशीच एक वेगळी घटना घडली

Appeal on Facebook for Dog Blood Donation | कुत्रीच्या रक्तदानासाठी फेसबुकवर आवाहन

कुत्रीच्या रक्तदानासाठी फेसबुकवर आवाहन

ऑनलाइन टीम
बेगळुरू, दि. ९ - रक्तदान हे श्रेष्ठदान मानलं जातं. मग त्याची गरज प्राण्यांनाही असू शकते. माणूसकी दाखवणारी अशीच एक वेगळी घटना घडली. जिक्सी नावाच्या लॅब्रॉडर जातीच्या पाळीव कुत्रीला टीक फिवर नावाचा ताप आला होता. जिक्सीच्या पालक वंदना गुप्ता यांनी जिक्सीला प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेले असता त्यांनी टीक फिवर नावाचा आजार झाल्याचे सांगितले. तसेच या आजाराचे निदान व्हावे म्हणून तिला ३५० मीली रक्त चढवण्यात आले. तरीही जिक्सीला बरं वाटत नव्हतं डॉक्टरांनी तिला आणखी रक्ताची गरज असल्याचे सांगितले. प्राण्यांसाठी रक्तमिळवणे ही बाब जरा दुर्मिळच असल्याने वंदना गुप्ता विचारात पडल्या. पाणीव प्राण्यांसाठी काम करणा-या ' व्हॉइस ऑफ स्ट्रॅ डॉग' या स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला असता त्यांनी जिक्सीचा फोटो फेसबुक वर टाकून तिला रक्ताची गरज असल्याचे वॉलपोस्टवर लिहले. तसेच जिकिसीच्या पालक वंदना, डॉ. अजितेश आणि डॉ. रमेश यांना अनेकांनी फोन केले. वंदना यांना मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि पंजाब येथून जिक्सीला लवकर बरं वाटावं म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या. संपर्क साधलेल्या अनेक लोकांनी आपल्या पाणीव कुत्र्याचे रक्त देणअयास तयारी दाखवली असता, त्यापैकी डॉक्टरांनी बबल्स या लॅब्रॉडर कुत्र्याच्या रक्ताची तपासणी करून त्याचे रक्त जिक्सीला चालणार असल्याचे सांगितले आणि तात्काळ त्याचे रक्त जिक्सीला देण्यात आले. जिक्सीची प्रकृति पुर्वी पेक्षा सुधारली असून अनेक श्वानप्रेमी वंदना यांना फोन करून शुभेच्छा देत आहेत.

Web Title: Appeal on Facebook for Dog Blood Donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.