शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

Video : शिक्षकाची बदली झाली अन् गावकऱ्यांनी अविस्मरणीय असा दिला निरोप! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 14:02 IST

Village Residents Giving Warm Send Off To Govt School Teacher : गावातील लोकांनी मोठ्या आनंदाने या शिक्षकाला निरोप दिला.

ठळक मुद्देहा व्हिडीओ आतापर्यंत ६ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर या व्हिडीओला ६०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

सोशल मीडियावर एका आदर्श शिक्षकाच्या निरोप समारंभाचा (Teacher Farewell) व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका गावातील सरकारी शाळेतील शिक्षकाची बदली झाली, त्यावेळी त्या गावातील लोकांनी मोठ्या आनंदाने या शिक्षकाला निरोप दिला.

यावेळी गावातील लोकांनी या शिक्षकाचे पाय धुतले, खांद्यावर घेऊन नाचत परंपरेप्रमाणे निरोप दिला. (Village Residents Giving Warm Send Off To Govt School Teacher)  हा निरोपाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ आयएएस अधिकारी डॉ. एम व्ही राव (IAS Officer Dr. M V Rao, IAS) यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.  

आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) विजयनगरम (Vijayanagaram) जिल्ह्यातील गुम्मा लक्ष्मीपुरम (Gumma Lakshmipuram) गावात मल्लूगुडा सरकारी शाळेतील शिक्षक नरेंद्र गोवडू (Narender Gowdu) यांची बदली झाली. त्यानंतर या गावातील लोकांनी शिक्षक नरेंद्र गोवडू यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात केला. निरोप समारंभादिवशी गावातील लोकांनी नरेंद्र गोवडू यांचे आपले पाय धुतले, त्यांना खांद्यावर बसून पारंपारिक नृत्य केले. 

दरम्यान, या शिक्षकाचा निरोप समारंभ पाहून आयएएस अधिकारी डॉ. एम व्ही राव यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. व्हिडिओ शेअर करताना त्यानी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सोशल मीडियावर इंटरेस्टिंग व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. आदिवासी ग्रामस्थांनी शिक्षकाला शानदार निरोप दिला. ज्यावेळी त्यांची दुसर्‍या ठिकाणी बदली झाली'.

हा व्हिडिओ आयएएस अधिकारी डॉ. एम व्ही राव यांनी २ फेब्रुवारीला संध्याकाळी ट्विटरवर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ आतापर्यंत ६ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर या व्हिडीओला ६०० हून अधिक लाईक्स मिळाले असून अनेकांनी री-ट्वीट केला आहे. बऱ्याच लोकांनी या व्हिडीओ पाहून निरोप समारंभ अविस्मरणीय असल्याची भावना व्यक्त केली आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशTeacherशिक्षकSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया