शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 15:47 IST

Bryan Johnson anti ageing diet: 'एज रिव्हर्स डाएट' अशा प्रकारच्या आहाराच्या आधारावर त्याने काही दावे केले आहेत

Bryan Johnson anti ageing diet: अमेरिकन उद्योगपती आणि बायोटेक फर्मचे सीईओ ब्रायन जॉन्सन हे अब्जाधीश आहेत. पण ते सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. गेल्या काही काळापासून ते चिरतरुण राहण्यासाठी खास गोष्ट करत आहेत. दिवसातून १८ तास उपवास करुन ते स्वत:ला तरुण ठेवत असल्याचा त्यांचा दावा आहे. वयाच्या ४७ व्या वर्षीही ते एखाद्या १८ वर्षांच्या तरुणासारखे दिसत आहेत, असा त्यांचा दावा आहे. 'एज रिव्हर्स डाएट' अशा प्रकारच्या आहाराच्या आधारावर ते असा दावा करत आहेत. या डाएटसाठी ते दरवर्षी सुमारे २ दशलक्ष डॉलर्स (१६ कोटी रुपये) खर्च करतात अशीही माहिती आहे.

रोज १८ तास उपवास करतात

बायोटेक फर्मचे सीईओ ब्रायन जॉन्सन यांनी अलीकडेच YouTuber रणवीर अल्लाबदियासोबतच्या पॉडकास्टमध्ये आले होते. या पॉडकास्ट शो मध्ये त्यांनी खुलासा केला की ते त्याच्या दैनंदिन आहारावर पूर्णपणे नियंत्रण ठेवतात आणि सर्व प्रकारचा आहार केवळ ६ तासांच्या वेळेतच खातात. ते दररोज १८ तास उपवास करतात आणि त्यांचे शेवटचे जेवण सकाळी ११ वाजता होते. त्यांचे हे डाएट शरीराला चांगल्या पेशी आणि इतर केमिकलची निर्मिती करण्यासाठी कार्य मदत करतात आणि शांत झोप लागण्यासाठी फायदेशीर ठरते.

आहारात कुठल्या गोष्टींचा समावेश?

ब्रायन यांनी सांगितले की ते त्यांच्या आहारात प्रामुख्याने कडधान्ये, भाज्या, बेरी, नट (अक्रोड, बदाम), बिया (चिया, अंबाडी) आणि एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल वापरतात. या आहारात भरपूर पोषण आणि अँटिऑक्सिडंट असतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. त्यांच्या मते, हे पदार्थ वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात. या डाएटमधील काही घटक हे पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतात. मात्र हे डाएट फॉलो करण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि असे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. पण अब्जाधीश उद्योगपतीने मात्र या डाएटचा उपयोग झाल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेHealthआरोग्यHealthy Diet Planआहार योजनाAmericaअमेरिकाbusinessव्यवसाय