शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

काय सांगता राव! पठ्ठ्यानं भारतातून अमेरिकेत नेल्या शेणाच्या गोवऱ्या; एअरपोर्टवरच कारवाई झाली अन् मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 16:47 IST

Airport cow dung cakes : आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतातून आलेल्या एका प्रवाशाच्या सामानामधून गोवऱ्या ताब्यात घेतल्या आहेत.

परदेशात राहणारे भारतीय नेहमीच भारतातून परत बाहेरगावी जाताना आपल्या घरातील तसंच गावात उपलब्ध असलेल्या अनेक वस्तू स्वतः सोबत घेऊन जातात. अनेकदा विमानतळावरील तपासणी दरम्यान या वस्तू अडचणीचे कारण सुद्धा ठरू शकतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  अमेरिकेच्या सीमाशुल्क सीमा (custom duty) आणि सीमा सुरक्षा अधिकाऱ्यांनी वॉशिंग्टन डीसी उपनगरातील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतातून आलेल्या एका प्रवाशाच्या सामानामधून गोवऱ्या ताब्यात घेतल्या आहेत.

भारतातल्या गावागावात गोवऱ्या रोजच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. यज्ञ, पूजा यांसाठी कुठेही गेलात तरी गोवऱ्या  लागतात. यापैकीच काही कारणांसाठी हा भारतीय माणूस गोवऱ्या घेऊन अमेरिकेला गेला असावा. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत शेणाच्या गोवऱ्यांवर बंदी आहे. कारण, या गोवऱ्यांमार्फत जनावरांमधील अत्यंत संसर्गजन्य आणि प्राणघातक असलेल्या (Foot-and-mouth disease ) नावाच्या रोगाचा प्रसार होतो. अमेरिकेच्या सीमाशुल्क आणि सीमा सुरक्षा अधिकाऱ्यांनी गोवऱ्या  नष्ट केल्याचे सांगितले जात आहे.  

बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो

समोर आलेल्या माहितीनुसार ही सूटकेस 4 एप्रिलला एअर इंडियाच्या विमानातून परत आलेल्या एका प्रवाशाची आहे. सीबीपी कृषी तज्ज्ञांना एका सुटकेसमधून दोन शेणी सापडल्या होत्या. त्या जप्त करण्यात आल्या आहेत. कस्टम अ‌ॅण्ड बॉर्डर प्रोटेक्शनं दिलेल्या माहितीनुसार  जगातील अनेक भागात शेणी स्वयंपाक करण्यासाठी इंधन म्हणून एक महत्त्वाचा घटक आहे.

नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं

याचा वापर एक रोगप्रतिरोधक आणि खत म्हणूनही केला जातो. हे अनेक फायदे असूनही, जनावरांच्या तोंडाला  जखमा करणाऱ्या आजाराच्या भीतीमुळे भारतातून शेणी घेऊन येण्यास मनाई आहे. असं मत सीबीपीनं स्पष्ट केलं आहे. 

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलAirportविमानतळAmericaअमेरिकाIndiaभारत